पिंपरी चिंचवड : रविवारी (ता. २९ नोव्हेंबर) सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सिनेमा कथा वाचनाचा कार्यक्रम झाला. अशोका सोसायटी, थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रपट संहिता हा सिनेमाचा पाय असतो तो मजबूत असायला पाहिजे तरच निर्माते आणि निर्मिती संस्था या स्पर्धेच्या युगात टिकाव धरू शकतात. आशा वेळी संहिता निवड प्रक्रियेमध्ये निर्मात्यांना चांगली कथा मिळावी आणि लेखकांना चांगला निर्माता मिळवा या एकमेव उद्देशाने हा उपक्रम दर रविवारी राबवण्यात येत आहे.
त्यामुळे निर्मात्यांना अनेक कथांचा पर्याय आणि लेखकांना एकाच वेळी अनेक निर्माते यांच्या समोर आपली कथा मांडता येत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते. द रायझिंग स्टार्स आणि विनय सोनवणे चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्येमाणे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक अनुभवी लेखक निर्माते दिग्दर्शक यांच्यासह नवीन मंडळींनीही सहभाग घेतला.
यावेळी एकूण चार कथांचे वाचन झाले. यामध्ये लेखक प्रतिनिधींपैकी सिद्धार्थ बनसोडे (सिनेमा कथा), विजय गायकवाड ( वेब मालिका ), माधव जोगळेकर ( एकांकिका ), रहेमान पठाण ( लघु चित्रपट ) यांनी विविध मध्येमांसाठी सादरीकरण होणार लिखाण वाचन करून दाखविले. स्क्रीन मध्येमांबरोबरच रंगमंचासाठी देखील कथेचं वाचन यावेळी घेण्यात आले. निर्माता प्रतिनिधी म्हणून अंकुश गवळी, अजय कुलकर्णी, रमेश चौधरी ( सिने दिग्दर्शक, निर्माता ), सागर गायकवाड आणि हनुमंत मोरे उपस्थित हिते.
कलाकार स्वयंसेवक प्रतिनिधी म्हणून राहुल जाधव (अभिनेता दिग्दर्शक ), करण दाभाडे (अभिनेता) साक्षी जोशी (अभिनेत्री) आणि राहुल राजे यांच्यासह इतर कलाकारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच चित्रपट कथा म्हणजे काय, कथा कशी असावी, त्यातील महत्वाचे घटक कोणते, कथा कशी बांधली जावी याविषयी संहिता मार्गदर्शन सल्लागार समितीतील राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक सिने दिग्दर्शक डॉ. शेष पाटील आणि लेखक माधव जोगळेकर यांनी मार्गदर्शन केले. तर सिनेमा कथा स्क्रीनवर मांडतांना या विषयी सिने दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय सोनवणे यांनी केले. येत्या रविवारी सिनेमा कथा वाचन उपक्रमाचा दुसरा कार्यक्रम सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत होणार असून यामध्ये पहिल्या सत्रात सिनेमा संहिता मार्गदर्शन आणि दुसऱ्या सत्रात सिनेमा कथा वाचन होणार आहे. नावनिर्मितीच्या शोधत असलेल्या निर्माता आणि दिग्दर्शक यांनी सहभाग घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले.
लेखकांनी त्यांच्या स्वलिखित आणि नोंदणीकृत कथाच ऐकवाव्यात असा लेखकांच्या वाङमय सुरक्षेसाठी नियम आहे. कार्यक्रमात सहभाग विनामूल्य आहे. लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अगोदर संयोजकांशी संपर्क साधून आपला सहभाग निश्चितच करावा लागेल असे संयोजन समितीने सांगितले.