वैविध्यपूर्ण आपला देश केवळ राज्यघटनेमुळेच एकत्र – निशांत कांबळे

वैविध्यपूर्ण आपला देश केवळ राज्यघटनेमुळेच एकत्र - निशांत कांबळे

चिंचवड : १३८ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात ३७ राज्य १० धर्म ७५०० जाती ३०० भाषा तसेच विविध संस्कृती आहेत. असा वैविध्यपूर्ण आपला देश ७० वर्षांपासून केवळ आपल्या राज्यघटनेमुळेच एकत्र आहे. तेही एका रेषेत आपल्या राज्यघटनेमुळेच ठेवू शकलो. त्यामुळे आपली राज्यघटना महान आहे. असे प्रतिपादन आयुष्यमान निशांत कांबळे यांनी केले.

चिंचवडगावातील सामाजिक संस्था प्रबुद्ध संघ यांच्या माध्यमातून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना आयुष्यमान निशांत कांबळे बोलत होते. या कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

या प्रसंगी प्रथम सविधान प्रास्ताविकेचे वाचन सामूहिकरीत्या करण्यात आले. सूत्रसंचालन सचिव आयुष्यमान किशन बलखंडे यांनी केले. प्रास्ताविक राजू वासनिक यांनी केले. तर आयुष्यमती प्रतिमा साळवी यांनी आभार मानले.