Tag: Chinchwad

चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात धम्मचक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा
सामाजिक

चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात धम्मचक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा

चिंचवड : प्रबुद्ध संघ चिंचवडगाव येथे प्रबुद्ध संघाच्या वतीने ६५ वा धम्म चक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला सभासदांच्या हस्ते पंचशील ध्वज रोहन करण्यात आला. त्यानंतर सामुदायिक पंचशील घेण्यात आले. त्यावेळी डॉ. धर्मेंद्र रामटेके, अल्पणा गोडबोले, अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव किशन बलखंडे यांनी केले. ...
काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत अनन्या, अग्रजा, दिया, भूमिकाने पटकावला प्रथम क्रमांक
पिंपरी चिंचवड

काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत अनन्या, अग्रजा, दिया, भूमिकाने पटकावला प्रथम क्रमांक

काळेवाडी : काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत वेगवेगळ्या चार वयोगटातील प्रथम क्रमांक अनन्या पाल, अग्रजा सदावर्ते, दिया सोमाणी व भूमिका क्षीरसागर यांनी पटकावला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा रविवारी बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा झाला. काळेवाडीतील हॅपी थॉटस बिल्डिंग येथे पार पडलेल्या या सोहळ्यात काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे सदस्य प्रदीप हाटे, सुरेश पाटील, प्रवीण अहिर, दिलीप भोई, वैभव घुगे, सोमनाथ पवार, खेमचंद तीलवानी, आशा इंगळे, शुभाष कांबळे, अशोक उत्तेकर, अनिल देसाई, सूनंदाताई काळे, अमित देशमुख, किशोर अहिर, बाबासाहेब जगताप, अमोल भोसले व संघटनेचे इतर सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबतच पिंपरी चिंचवड सिटिझन फोरमचे राजीव भावसार व तुषार शिंदे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत...
Moshi : यशस्वी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
शैक्षणिक

Moshi : यशस्वी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

मोशी : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल आदर्श नगर मोशी या शाळेमध्ये कोविंड 19 शासकीय मार्गदर्शक सूचनेचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे ध्वजारोहण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते झाले आपल्या प्रस्ताविकामध्ये भारतामधील स्वातंत्र्य, समता, बंधुता जाणीव करून दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते व संस्थेचे सचिव डॉक्टर तुषार देवकाते, शिक्षक वृंदाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे चित्रकला स्पर्धा | ५२० विद्यार्थ्यांचा सहभाग
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे चित्रकला स्पर्धा | ५२० विद्यार्थ्यांचा सहभाग

काळेवाडी : ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५२० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. एकुण आठ ठिकाणी या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, बक्षीस वितरण सोहळा पुढील आठवड्यात होणार असल्याचे प्रवीण अहिर यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत कोरोनामुळे पसरलेला हाहाकारामुळे मानवी जीवनाची झालेली अवस्था व अश्यातच स्वत:ची सुरक्षा, वैयक्तिक स्वच्छता, लस शोधण्यात भारतीय संशोधकांनी मारलेली यशस्वी मजल, लसीकरणाचा चालू असलेला प्रवास आणि याचेच एक फलित म्हणजे शाळा सुरू करण्याबाबतचा झालेला निर्णय. या निर्णयाला अनुसरूनच विद्यार्थ्यांना कुठेतरी एक शाळेची व आपल्या सवंगड्याची व वर्गमित्रंची गाठभेट व्हावी व ती एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून व्हावी यासाठी काळेवाडी रेसिडेंट व...
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी महावृक्ष – कॅप्टन संतोष कोकणे
पिंपरी चिंचवड

भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी महावृक्ष – कॅप्टन संतोष कोकणे

रहाटणी : ७१ वर्षापूर्वी साधी टाचणी बनवण्यास पात्र नसलेला देश आज चंद्रमोहीम, मंगळमोहीमद्वारे आकाशाला गवसणी घालत आहे. कोरोना प्रतिबंधक लस आपल्या देशानेच बनवली असल्यामुळे आपल्या देशाचे जगात नावलौकिक झाले आहे. १९५० ला लावलेले इवलेसे लोकशाहीचे रोपटे आज जगात सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी महावृक्ष ठरत आहे” असे प्रतिपादन कॅप्टन संतोष कोकणे यांनी येथे केले. येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचालित, न्यू सिटि प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कॅप्टन संतोष कोकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या निमित्ताने शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व लेझीमचे आयोजन करण्यात आले होते तसेच परेड करण्यात आले. त्याप्रसंगी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, संत तुकाराम महाराज शिक्षण संस्...
भोसरीत वेलफेअर पार्टी ऑफ इंडियातर्फे ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

भोसरीत वेलफेअर पार्टी ऑफ इंडियातर्फे ध्वजारोहण

भोसरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण मौलाना इनायत करीम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शहराध्यक्ष सालार भाई शेख उपाध्यक्ष इमाम भाई नदाफ, उपसचिव शब्बीर भाई नदाफ, उपसेक्रेटरी सरदार पठाण, पिंपरी विधानसभा अध्यक्ष फिरोज तांबोळी, बालाजीनगर वॉर्ड कार्याध्यक्ष महिबुब नदाफ, बालाजी नगर उपाध्यक्ष रमजान आत्तार, बालाजीनगर वॉर्ड उपसैक्रेटरी अनिल शिंदे, बालाजीनगर मधील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनी अरिषा लेडीज कॉर्नर या दुकानाचे उद्घाटन वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सालार भाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रज्जाक पानसरे (क्रीडा अधिकारी) यांना जिवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ...
समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे – डॉ. किशोर खिलारे
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे – डॉ. किशोर खिलारे

पिंपरी चिंचवड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आकुर्डीगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शरण बहादूर यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आकुर्डी आकुर्डी येथील कार्यालयात 'आम्ही भारताचे लोक आणि आमचे प्रजासत्ताक' विषयावर डॉ. किशोर खिलारे (सहयोगी प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय,पिंपरी चिंचवड मनपा) यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाच्या वतीने डॉ. किशोर खिलारे यांचा कोव्हीड-19 काळातील अतुलनीय आरोग्य सेवेबद्दल शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच क्रांतिकुमार कडुलकर यांचा ऑनलाइन ऑफिस व्यवस्थापन आणि अविनाश लाटकर, रंजिता लाटकर यांचा ऑफिस नूतनिकरणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन कॉम्रेड गणेश दराडे, अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर सत्कार यांनी केला.. डॉ. किशोर खिलारे यांनी भारतीय प्रजासत्ताक भारताचा आढावा घेताना सांगितले की, "समाजातील आर्थिक...
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण

आकुर्डी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने आकुर्डीगाव महापालिका दवाखाना येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शरण बहादूर यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गणेश दराडे, सतीश नायर, बाळासाहेब घस्ते, क्रांतिकुमार कडुलकर, वीरभद्र स्वामी (माकप), अमिन शेख, विनोद चव्हाण, शिवराम ठोंबरे,नागेश दोडमनी,किसन शेवते,अविनाश लाटकर(DYFI)अपर्णा दराडे, सुषमा इंगोले,यल्लमा कोलगी,रंजिता लाटकर, शेहनाज शेख,शैलजा कडुलकर,मंगल डोळस,मनीषा सपकाळे,कविता मंधोदरे,पूजा दोडमनी(महिला संघटना) आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ...
मनोरंजन

सिनेमा कथा वाचनाच्या उपक्रमाला सुरुवात

पिंपरी चिंचवड : रविवारी (ता. २९ नोव्हेंबर) सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सिनेमा कथा वाचनाचा कार्यक्रम झाला. अशोका सोसायटी, थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रपट संहिता हा सिनेमाचा पाय असतो तो मजबूत असायला पाहिजे तरच निर्माते आणि निर्मिती संस्था या स्पर्धेच्या युगात टिकाव धरू शकतात. आशा वेळी संहिता निवड प्रक्रियेमध्ये निर्मात्यांना चांगली कथा मिळावी आणि लेखकांना चांगला निर्माता मिळवा या एकमेव उद्देशाने हा उपक्रम दर रविवारी राबवण्यात येत आहे. त्यामुळे निर्मात्यांना अनेक कथांचा पर्याय आणि लेखकांना एकाच वेळी अनेक निर्माते यांच्या समोर आपली कथा मांडता येत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते. द रायझिंग स्टार्स आणि विनय सोनवणे चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्येमाणे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक अनुभवी लेखक निर्माते दिग्दर्...
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान तर्फे गरजूंना धान्य वाटप
पिंपरी चिंचवड

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान तर्फे गरजूंना धान्य वाटप

चिंचवड (लोकमराठी) : शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यामुळे गरजूंनी समाधान व्यक्त केले. जास्तीत नागरिकांनी आपल्या आसपासच्या गरजूंना अन्नधान्य वाटप करावे. असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या देशावरती कोरोना विषाणुच्या भयंकर संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामूळे बहुसंख्य लोकांना आपला रोजगार सोडून घरी बसावे लागले आहे. त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मसाला, गूळ असे अन्नधान्याचे किट देण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक नारायण बहिरवाडे व मंगेश पाटील यांच्या हस...