चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात धम्मचक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा

चिंचवडगावातील प्रबुद्ध संघात धम्मचक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा

चिंचवड : प्रबुद्ध संघ चिंचवडगाव येथे प्रबुद्ध संघाच्या वतीने ६५ वा धम्म चक्र परिवर्तनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला सभासदांच्या हस्ते पंचशील ध्वज रोहन करण्यात आला. त्यानंतर सामुदायिक पंचशील घेण्यात आले.

त्यावेळी डॉ. धर्मेंद्र रामटेके, अल्पणा गोडबोले, अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव किशन बलखंडे यांनी केले.