नगरसेविका सविता खुळे यांच्यातर्फे कुस्ती निवड चाचणी स्पर्धातील विजेत्यांचा सत्कार

नगरसेविका सविता खुळे यांच्यातर्फे कुस्ती निवड चाचणी स्पर्धातील विजेत्यांचा सत्कार

रहाटणी : पिंपरी चिंचवड कुस्ती निवड चाचणी स्पर्धामध्ये ऋषिकेश संजय नखाते (६१ किलो), यश शरद नखाते (माती- ८६ किलो), राजू बाळासाहेब हिप्परकर (७४ किलो- मॅट) मोहन रामचंद्र कोकाटे (८७ किलो) आदी सर्व विजेत्या खेळाडूंचे नगरसेविका सविता बाळकृष्ण खुळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, महाराष्ट्र चॅम्पियन बाबा तांबे, शाहू केसरी अजय कदम, पिंपरी चिंचवड केसरी निलेश नखाते, महाराष्ट्र चॅम्पियन शिवराज तांबे, काळूराम कवितके, राजू बालवडकर, श्याम गोडांबे, माउली जाधव, रंजीत घुमरे, मेजर कोडक, मेजर काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते.

Actions

Selected media actions