काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत अनन्या, अग्रजा, दिया, भूमिकाने पटकावला प्रथम क्रमांक

काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत अनन्या, अग्रजा, दिया, भूमिकाने पटकावला प्रथम क्रमांक

काळेवाडी : काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत वेगवेगळ्या चार वयोगटातील प्रथम क्रमांक अनन्या पाल, अग्रजा सदावर्ते, दिया सोमाणी व भूमिका क्षीरसागर यांनी पटकावला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा रविवारी बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा झाला.

काळेवाडीतील हॅपी थॉटस बिल्डिंग येथे पार पडलेल्या या सोहळ्यात काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे सदस्य प्रदीप हाटे, सुरेश पाटील, प्रवीण अहिर, दिलीप भोई, वैभव घुगे, सोमनाथ पवार, खेमचंद तीलवानी, आशा इंगळे, शुभाष कांबळे, अशोक उत्तेकर, अनिल देसाई, सूनंदाताई काळे, अमित देशमुख, किशोर अहिर, बाबासाहेब जगताप, अमोल भोसले व संघटनेचे इतर सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यासोबतच पिंपरी चिंचवड सिटिझन फोरमचे राजीव भावसार व तुषार शिंदे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत मुथीयान, साजी वरकी, प्रमोद ताम्हणकर व नगरसेवक संतोष कोकने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप हाटे व सूत्रसंचालन प्रवीण अहिर यांनी केले

दरम्यान, या स्पर्धेत ५२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चार वेगवेगळ्या वयोगटात विभागणी करून त्यानुसार वेगवेगळी विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमासाठी खुप चांगला प्रतिसाद दिला. काही विद्यार्थ्यांनी तर एवढी सुंदर चित्र काढली की आयोजकांना सुद्धा आपल्या उपक्रमाचा एक वेगळा आनंद व अविस्मरणीय अनुभव पाहायला मिळाला. सुरुवातीला प्रत्येक वयोगटातील पाहिले तीन विजयी विद्यार्थी निवडायचे ठरवले होते, पण काही चित्र बघून काही विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी प्रत्येक वयोगटातील काही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. असे आयोजकांनी सांगितले.

यावेळी २५ विद्यार्थ्यांची प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहन अश्याप्रकरची विभागणी करून बक्षीस देण्यात आले. वेगवेगळ्या चार वयोगटातील प्रथम क्रमांक अनन्या पाल, अग्रजा सदावर्ते, दिया सोमाणी व भूमिका क्षीरसागर यांनी पटकावला.