मा. आमदार आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

मा. आमदार आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पिंपरी चिंचवड : काळेवाडी रहाटणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

हा सन्मान सोहळा मा. आमदार अध्यक्ष ॲाफ इंडीया केमिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांच्या हस्ते पार पडला. त्यामुळे मा. आमदार जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे, केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्ट उपाध्यक्ष विवेक तापकीर, परविंदरसिंग बाध, स्वप्नील जंगम, आशिष परमार, तेजस साळवी, म्हाळप्पा दुधभाते, केतन थोरात, संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.