कर्जत : भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका उपाध्यक्ष पदी भाऊसाहेब सोपान गावडे यांची निवड झाली. त्यानिमित्त चांदे बुद्रूक येथील इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चाँद भाई मुजावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल खोमणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगधने, योगेश जगधने, तात्यासाहेब जगताप व युवा नेते नंदकुमार नवले, माजी सरपंच अनिल सुर्यवंशी, अनिल खोमणे, चेअरमन गोकुळ नवले, नितीन गंगावणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, गावडे यांची निवड झाल्याने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुक्याचा उपाध्यक्ष पदाचा मान व जबाबदारी मिळाल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्वांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.