Tag: Karjat News

AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता
महाराष्ट्र, मोठी बातमी

AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता

संग्रहित छायाचित्र अहमदनगर : कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक, मुळेवाडी, कोंभळी गावात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध धंद्यांचा पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापर्यंत हप्ता पोहचत असल्याचे सांगितले जात आहे. गावातच हात भट्टी, देशी विदेशी दारू उघडपणे मिळत असल्याने तरूण पिढी त्याकडे आकर्षित होत आहे. तर कौटुंबिक वाद, हिंसाचार वाढला असून बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सामाजिक शांतता भंग पावत आहे. अहमदनगर पोलीस आणि हप्ता वसूली नवीन नाही. या आधी अहमदनगर पोलीसांची हप्ते वसूली चव्हाट्यावर आली होती. अवैध दारू विक्री होणारी (Chande Bk, Mulaywadi, Kombhali) ही गावे कर्जत पोलीसांच्या...
रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
सामाजिक, महाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

कर्जत, ता. ५ (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कर्जत (Karjat) सिटीच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोमवारी (ता. ४) श्री आशितोष महादेव पायी दिंडी ही कर्जतहुन पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथे मुक्कामी होती. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सचिव प्रा. सचिन धांडे यांच्याकडे पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी घेण्यात आली. यात एकूण १५० वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसाठी रोटरीयन डॉ. विजयकुमार चव्हाण डॉ. अद्वैत काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे नूतन अध्यक्ष अभयकुमार बोरा, सचिव प्रा. सचिन धांडे माजी अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, माजी सचिव राजेंद्र जगताप, माजी अध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, दयानंद पाटील, संदीप गदादे, सदाशिव फरांडे...
भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गावडे यांचा इन्सानियत फाउंडेशनतर्फे सत्कार
महाराष्ट्र

भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गावडे यांचा इन्सानियत फाउंडेशनतर्फे सत्कार

कर्जत : भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका उपाध्यक्ष पदी भाऊसाहेब सोपान गावडे यांची निवड झाली. त्यानिमित्त चांदे बुद्रूक येथील इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चाँद भाई मुजावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल खोमणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगधने, योगेश जगधने, तात्यासाहेब जगताप व युवा नेते नंदकुमार नवले, माजी सरपंच अनिल सुर्यवंशी, अनिल खोमणे, चेअरमन गोकुळ नवले, नितीन गंगावणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गावडे यांची निवड झाल्याने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुक्याचा उपाध्यक्ष पदाचा मान व जबाबदारी मिळाल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्वांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. ...
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू – प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले
महाराष्ट्र

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू – प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले

कर्जत, ता. २४ (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू शकतो. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने राबविलेला घनवन प्रकल्प हा एक स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि कर्जत नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील छत्रपती नगर येथे मियावाकी (घनवन प्रकल्प) हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, सचिव राजेंद्र जगताप, संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काळदाते, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल, दादा पाटील महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग प्रमुख मेजर संजय चौधरी, नगराध्यक्षा उषा र...
कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न
महाराष्ट्र

कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना यांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न झाला असून सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याचे मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले. कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना ही गेल्या ५२० दिवसांपासून स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे अखंड कार्य करीत असून पर्यावरण, स्वच्छता आणि पर्यावरणाशी निगडित विविध जैवविविधता यांचा अभ्यास करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामाजिक संघटनेचे ३०ते ३५ स्वयंसेवक ४ व ५मार्च रोजी मुंबई अभ्यास दौऱ्यावर गेले होते. यावेळी किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र ऐरोली(नवी मुंबई)येथे फ्लोमिंग पक्षी माहिती, तसेच पाण्यातील खारफुटी वृक्ष आणि त्यांचे पाण्यातील मासे,किटक आणि पक्ष्यांसाह वातावरणातील शुद्ध हवा, मासे उत्पत्ती आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि विविध जैविक घ...
चांदे बुद्रुक विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमनचा सत्कार
महाराष्ट्र

चांदे बुद्रुक विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमनचा सत्कार

कर्जत (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : चांदे बुद्रुक विकास सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन संतोष नवले, व्हाईस चेअरमन दादा किसन जगताप आणि युवा नेते नंदकुमार नवले यांचा चांद मुजावर, अमोल खोमणे व ग्रामपंचायत सदस्य नितीन जगधने मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी रामदास थोरात, नामदेव सूर्यवंशी, बाप्पू नवले, बंडू सूर्यवंशी, माजी चेअरमन रामदास नवले, अण्णा कांतीलाल नवले, तेजस नवले, बाळासाहेब जगताप, विशाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते. ...
कर्जत तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक संपन्न
महाराष्ट्र

कर्जत तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यात तहसील कार्यालय अंतर्गत अहमदनगर जिल्हा पालक मंत्री यांचे शिफारशीनुसार नवीन संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती नुकतीच गठीत करण्यात आली. शासन निर्णयातील तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करून तहसीलदार कर्जत यांनी संजय गांधी निराधार समितीसमोर मंजूरीचे कार्यवाहीसाठी ठेवणेत यावेत अशी तरतूद आहे. यास्तव १४ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात नवीन संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. प्रथमत: बैठकीस उपस्थित समिती अध्यक्ष व सदस्य यांचे तहसीलदार कर्जत यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे १५२ अर्ज मंजूर झाले व श्रावणबाळ योजनेचे १४४ अर्ज मंजूर, तर ५६ अर्ज...
कर्जत नगराध्यक्षपदी उषा राऊत तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र

कर्जत नगराध्यक्षपदी उषा राऊत तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड

कर्जत, दि. १६ (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उषा अक्षय राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली असल्याची पीठासीन तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी जाहीर केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, मुखाधिकारी गोविंद जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी दि. ९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उषा अक्षय राऊत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. सदरचा अर्ज वैध ठरला असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली होती. मात्र १६ रोजी नगराध्यक्षपदासह उपनगराध्यक्ष पदाची अधिकृत निवड जाहीर होणार होती. बुधवार, दि १६ रोजी सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी लोकानियुक्त सर्व नगरसेवकांची बैठक घेत कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून उषा अक्...
रोटरी क्लब कर्जत सिटीच्या वतीने महिला स्वच्छता कामगारांचा साडी देऊन सत्कार
महाराष्ट्र

रोटरी क्लब कर्जत सिटीच्या वतीने महिला स्वच्छता कामगारांचा साडी देऊन सत्कार

कर्जत, ता. २० (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कर्जत शहरातील नगरपंचायतीच्या महिला स्वच्छता कामगारांचा तिळगुळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला. साई हॉस्पिटल याठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रोटरीचे सदस्य रो. अक्षय राऊत तसेच रो. ओंकार तोटे या दोघांच्या सौभाग्यवतींनी कर्जत नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या वेळेस विजय मिळवल्याबद्दल त्यांचा सपत्नीक रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रोटरीचे माजी अध्यक्ष रो. प्रा. विशाल मेहेत्रे यांनी रोटरीने आजपर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या वेळी नवनियुक्त नगरसेविका उषा राऊत यांनी सत्काराला उत्तर देताना रोटरी क्लबचे आभार मानले व रोटरी क्लब राबवित असलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की कर्जत शहरा...
कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा | आ. रोहित पवार यांनी दिला राम शिंदेना पराभवाचा झटका
मोठी बातमी, महाराष्ट्र, राजकारण

कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा | आ. रोहित पवार यांनी दिला राम शिंदेना पराभवाचा झटका

कर्जत, ता. १९ (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने १५ जागेवर एकहाती विजय मिळवत भाजपाचा दारुण पराभव केला. माजीमंत्री राम शिंदे यांना अवघे दोनच जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा आ. रोहित पवार यांनी राम शिंदेना पराभवाचा झटका देत कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तातंर घडविले. कर्जतकरानी राम शिंदे यांनी प्रचारादरम्यान आ. रोहित पवार यांच्यावर दहशतीच्या राजकारणाचा केलेला आरोप खोडून काढला. सर्वच विजयी उमेदवारांनी ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांचे आशीर्वाद घेत जल्लोष केला. मात्र, राष्ट्रवादीच्या मनीषा सोनमाळी यांचा प्रभाग क्रमांक चारमधील पराभव राष्ट्रवादीस जिव्हारी लागला. कर्जत नगरपंचायतीच्या एकूण १७ जागेसाठी ८१.८७% मतदान संपन्न झाले होते. या सर्व जागेची मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात दोन...