कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न

कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना यांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न झाला असून सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याचे मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले. कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना ही गेल्या ५२० दिवसांपासून स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे अखंड कार्य करीत असून पर्यावरण, स्वच्छता आणि पर्यावरणाशी निगडित विविध जैवविविधता यांचा अभ्यास करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामाजिक संघटनेचे ३०ते ३५ स्वयंसेवक ४ व ५मार्च रोजी मुंबई अभ्यास दौऱ्यावर गेले होते.

यावेळी किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र ऐरोली(नवी मुंबई)येथे फ्लोमिंग पक्षी माहिती, तसेच पाण्यातील खारफुटी वृक्ष आणि त्यांचे पाण्यातील मासे,किटक आणि पक्ष्यांसाह वातावरणातील शुद्ध हवा, मासे उत्पत्ती आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि विविध जैविक घटकांची माहिती नवी मुंबई कांदळवन परिक्षेत्र अधिकारी वासुदेव कोकरे, श्री.वरक यांनी दिली. नौकारविहारतून फ्लोमिंग पक्षांची माहिती मिळाली. तसेच बोरीवली (मुंबई) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे या पूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्य केलेल्या अनिल तोरडमल यांच्या सह तेथील अधिकाऱ्यांनी वृक्ष, ववन्यजीव, जलचर प्राणी, सरपटणारे प्राणी, रात्रीच्या वेळी फिरणारे कीटक यांची माहिती देऊन वाघ, सिंह, आणि बिबटे आदि. प्राण्यांविषयीची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सफारीचे वनाधिकारी श्री.बारब्दे, श्रीमती शेंडगे, श्री.मेहुल, प्रा. जगदीश वाकळे यांनी दिली.

कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे चारही बाजूने विस्तारलेल्या मुंबई महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक शुद्ध आणि नैसर्गिक वातावरण निर्माण करणारे केंद्र आहे.हे मुंबईतील शुद्ध हवा देणारे ठिकाण असल्याचे समजले.तसेच हिंस्त्र वन्य प्राणी असतानाही येथील आदिवासी समाज वस्ती आहे हे लोक आणि हिंस्र वन्यप्राणी हे एकमेकांची काळजी घेत जीवन जगतात. अशी माहिती येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे संचालक श्री. मल्लिकार्जुन यांनी दिली. तसेच जलस्रोत स्वच्छतेच्या बाबतीत उत्तम उदाहरण म्हणजे तुळशी तलाव हे तलाव आजही मुंबईला स्वच्छ पाणी पुरवठा करीत आहे. विशेष म्हणजे हे जलस्रोत वनविभागाने स्वच्छ ठेवले आहे अशी माहिती तुळशीचे वनाधिकारी श्री. देसले त्रिंबक जाधव यांनी दिली आहे.

तसेच एक कागदाचा तुकडा किंवा कसलाही कचरा या तलावाच्याया आवारात किंवा परिसरात दिसला नाही.येथील वृक्षांची माहिती घेतली असता सर्व देशी वृक्षांची लागवड या ठिकाणी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या ठिकाणी सायकल वापरला प्राधान्य आहे. त्यासाठी वनविभागाने सशुल्क सायकल ठेवल्या आहेत. अनेक पर्यटकांसह सकाळी फिरायला या ठिकाणी मुंबईतील आबालवृद्ध येतात हे पाहायला मिळाले आहे.स्वच्छतेलाही या ठिकाणी खूप महत्व आहे. सर्व सामाजिक संघटनेने याठिकाणी स्वच्छता केली यावेळी सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांसह तेथील अधिकारीवर्गाने कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनेचे कार्य हे वाखाण्याजोगे असून भविष्यात हे काम सर्वांना प्रेरणादायी ठरेल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

या नंतर सर्व सामाजिक संघटना वांद्रे-वरळी सागरी सेतू, गिरगांव चौपाटी,मरीन लाईन, मंत्रालय, गेट वे ऑफ इंडियामार्गे परतीच्या प्रवास झाला. यावेळी वाशी येथे कर्जत येथील भूमिपुत्र वाशी येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल आणि नेरुळ येथील पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याचा गौरव करून सर्वांचा सन्मान केला. तसेच कर्जतचे भूमिपुत्र मंत्रालयातील कृषी विभागाचे सहसचिव बाळासाहेब रासकर यांनी सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याला प्रभावित होऊन मुंबईत भेट घेऊन ११हजार रुपयांची देणगी देऊन अभियानाला शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यात खालापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार,कृष्णगिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक,भालचंद्र म्हात्रे आदींनी सहकार्य केले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते कमल कोठारी, गोपाळ झवेरी, बजरंग अग्रवाल, पांड्याजी आदींनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन केले आणि हे कार्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे सेवानिवृत्त अधिकारी अनिल तोरडमल यांनी प्रेरणा व सहकार्य केल्याने आपण केल्याचे सांगितले आहे. आणि कर्जत येथे सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांनी कर्जतमध्ये सुरू केले आहे. हे निश्चित कौतुकास्पद आहे. असे सांगितले.