आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणीत बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रहाटणीत बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

रहाटणी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त देविदास आप्पा तांबे यांच्या वतीने रहाटणीतील तमारा सोसायटीमध्ये बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सोसायटीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी सहभाग घेतला होता.

तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासही रहिवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्यांना देविदास आप्पा तांबे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी तात्या शिनगारे, दीपक जाधव यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

मुली एकेरी

विजेत्या - गिरीजा पाटील

उपविजेता - अन्वी शर्मा

✅ मुले एकेरी

विजेता - अनिरुद्ध पाटील

उपविजेता - अभिनव

✅ मुले दुहेरी

विजेता - अनिरुद्ध + नक्ष

उपविजेता - यथार्थ + पार्थ

✅ महिला एकेरी

विजेती - सायली सराफ

उपविजेता - आयेशा शर्मा

✅ महिला दुहेरी

विजेती - खुशी + गिरीजा

उपविजेता - नंदिनी + सुप्रिया

✅ पुरुष एकेरी

विजेता - किशोर डोंगरे

उपविजेता - अभिजीत पाटील

✅ पुरुष दुहेरी

विजेता - किरण + किशोर

उपविजेता - अभिजीत + नरेश