पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू – प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू - प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले

कर्जत, ता. २४ (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू शकतो. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने राबविलेला घनवन प्रकल्प हा एक स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे.

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि कर्जत नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील छत्रपती नगर येथे मियावाकी (घनवन प्रकल्प) हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, सचिव राजेंद्र जगताप, संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काळदाते, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल, दादा पाटील महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग प्रमुख मेजर संजय चौधरी, नगराध्यक्षा उषा राऊत, नगरसेविका मोनाली तोटे, ज्योतीताई शेळके, छायाताई शेलार, ताराबाई कुलथे, प्रतिभाताई भैलुमे, हर्षदा काळदाते, नगरसेवक सतीश पाटील, भास्कर भैलुमे, भाऊ तोरडमल, रज्जाक झारेकरी, देविदास खरात, दत्तात्रय पिसाळ, रोटरीयन प्रा. विशाल मेहेत्रे, राजेंद्र सुपेकर, घनश्याम नाळे, सचिन धांडे, संदीप गदादे, नितीन देशमुख, अक्षय राऊत, गणेश जेवरे यांच्यासह सर्व रोटरी क्लबचे सदस्य महिला, सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार एनसीसीचे छात्रसैनिक उपस्थित होते. हा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे प्रोजेक्ट चेअरमन प्रा. विशाल मेहेत्रे आणि मार्गदर्शक अनिल तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला.

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू - प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले

यावेळी बोलताना सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल म्हणाले की, सध्यस्थीत वातावरणात प्रचंड बदल घडून निसर्गाचा ऱ्हास होत चालला असून भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल. झाडे कमी होत चालल्याने फुलपाखरू, माश्या, कीटक हे कमी यांच्याकडून परागीकरण प्रक्रिया कमी झाल्याने आपली शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भविष्यात निरोगी आणि आरोग्यदायी जगायचे असेल तर झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून रोटरी क्लबच्या माध्यमातून हे घनवन तयार होते आहे हे निश्चित पर्यावरण आणि कर्जतच्या वैभवात भर घालणारे आहे.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते म्हणाले की, रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी एक सामाजिक भान जपणारी संघटना असून अनेक स्तरावर काम करीत असताना प्रामुख्याने पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी संघटना आहे. आज हजारो झाडे लावून सर्वांच्या सहकार्याने पर्यावरणातील एक मोठा प्रकल्प रोटरी क्लब करीत असल्याचे समाधान आहे. असे काळदाते म्हणाले.यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, डॉ. संदीप काळदाते, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक सतिष पाटील आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक प्रा. विशाल मेहेत्रे यांनी तर सूत्रसंचालन रवींद्र राऊत यांनी केले.