शहरातील विद्यालयात स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे वर्ग सुरु करणार : चंद्रशेखर जाधव

शहरातील विद्यालयात स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे वर्ग सुरु करणार : चंद्रशेखर जाधव
  • शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना युवक कॉंग्रेसचे अभिवादन

पुणे : ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरुध्द लढत असताना स्वतःच्या प्राणाची आहुती देणा-या शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे बलिदान आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आज भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास त्यातील बलस्थाने आणि प्रेरणास्थाने नव्या पिढीने पुन्हा अभ्यासण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले.


बुधवार (दि. २३ मार्च) ९१ व्या शहिद दिना निमित्त पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने राजगुरुनगर खेड येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, पिंपरी चिंचवड शहर पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अक्षय शहरकर, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, मयुरेश रोकडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष संदेश बोर्डे, जिफिन जॉन्सन, विक्रांत सानप, मनोज लष्करे, परमेश्वर पांचाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी युवक कार्यकर्त्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणा दिल्या. शहिद दिन आणि स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास या विषयावर इतिहासकार व अभ्यासकांचे मार्गदर्शन वर्ग महिन्यातून दोन रविवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात शहर काँग्रेसच्या वतीने सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती यावेळी चंद्रशेखर जाधव यांनी दिली.