भोसरीच्या घाटात पुन्हा सुरु होणार बैलगाडा शर्यत : ॲड. नितीन लांडगे

भोसरीच्या घाटात पुन्हा सुरु होणार बैलगाडा शर्यत : ॲड. नितीन लांडगे

पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) भाजपाचा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा दिला. मा. सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर बैलगाडा शर्यत घेण्यास परवानगी दिल्यामुळे आता लवकरच भोसरीतील घाटावर पुन्हा बैलगाडा शर्यत सुरु होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड स्थायी समितीचे ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.


गुरुवारी ॲड. नितीन लांडगे यांनी पुणे जिल्हा गाडा मालक संघटनेचे अध्यक्ष भानूदास लांडगे यांच्या सह भोसरीतील घाटाची पाहणी केली व आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता बोपन्ना गट्टूवार यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक पंडीत गवळी, गाडा मालक अनिकेत विष्णू लांडगे तसेच गाडा मालक संघटनेचे पदाधिकारी व भोसरीतील गाडा मालक उपस्थित होते.