कालीचरणविरूद्ध कुठेही केस करा, त्या केसेस मोफत चालविणार – ऍड. असीम सरोदे

कालीचरणविरूद्ध कुठेही केस करा, त्या केसेस मोफत चालविणार - ऍड. असीम सरोदे

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरण महाराज (kalicharan maharaj arrested) याला अखेर अटक करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कालीचरणच्या विरोधात महाराष्ट्रात कुठेही पोलीस तक्रारी करण्यात येतील किंवा न्यायालयात केसेस दाखल करण्यात येतील. त्यांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. असे आवाहन विधीज्ञ ऍड. असीम सरोदे यांनी केले आहे.

ऍड. असीम सरोदे यांनी आपल्या फेसबुक खात्यावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कालीचरण या उथळ व धर्मांध व्यक्तिविरोधात महाराष्ट्रात कुठेही मोफत केसेस चालविण्यासाठी मी आमच्या वकिलांच्या टीमसोबत कायदेविषयक कामकाज बघू. केवळ लोकवर्गीणीतून प्रवास खर्च करावा.

लोकशाही रक्षणासाठी विषारी हिंदू व विषारी मुस्लिमांना थांबविणे, रोखणे, कायद्याची आडकाठी आणणे आवश्यक आहे. सामान्य हिंदू किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन इत्यादी विचारी असतात व त्यांच्यामुळेच या भारताची ताकद कायम राहील. असे ऍड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

ओवेसीविरोधातही मोफत केस चालविणार

ओवेसी व तसल्या कट्टरवादी विषारी मुस्लिम नेत्यांच्याविरुद्ध तुम्ही केस करा. आत्ता नाही कधीही करा मी पूर्ण मोफत केस चालवण्यासाठी तयार आहे. असे जयपाल पलकोंदवार (Jaipal Palkondwar) या महाराजाच्या समर्थकाने केलेल्या पोस्टला उत्तर देताना ऍड. असीम सरोदे यांनी या भक्ताला सुनावले.