जागतिक दिव्यांग दिन विशेष : अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश : “सप्तर्षी फाउंडेशन”
✪ इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन
✪ बौद्धिक अक्षम मुलाकडून मिळालेली प्रेरणा
✪ बेवारसांचे वारस आम्ही
✪ जोडीने जाऊ पुढे
✪ संवेदनशीलतेची क्षमता
✪ आमच्यासाठी आम्ही एक दिवसही काढला नव्हता
✪ एक दिवस संस्थेचीही गरज उरू नये
३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये २१ प्रकारच्या दिव्यांग किंवा विविध प्रकारे विकलांग (differently abled) व्यक्तींचा समावेश होतो. त्यात अंध, मूकबधिर, शरीराने अधू असे शारीरिक दिव्यांग आणि बौद्धिक अक्षम असलेले, स्वमग्नता (ऑटीझम), सेरेब्रेल पाल्सी, डाऊन्स सिंड्रोम, अध्ययन अक्षमता असलेले (Learning disabilities), बहुविकलांग अशा बौद्धिक दिव्यांगांचा व इतरही प्रकारांचा समावेश होतो. आजचा दिवस ह्या सर्वांचे कष्ट आठवण्याचा, त्यांच्याबद्दल संवेदना जागी करण्याचा व ह्यांच्या भल्यासाठी काम करणा-या संस्था व व्यक्तींबद्द...