घर खरेदी करताना घ्यायची काळजी
संकलन : क्रांतिकुमार कडुलकर
घर खरेदी करताना नेमकं काय काय पहायचं, कशाकशाचा विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा याबाबत खूपदा आपल्याला माहिती नसते. म्हणून संबंधित व्यवहार करताना काय करावं आणि करू नये याची माहिती-
प्रश्न : नवीन सदनिका खरेदी करतेवेळी काय करायला हवे आणि काय करू नये?उत्तर : नवीन सदनिका ठेकेदार किंवा विकासकाकडून (बिल्डर-डेव्हलपर) खरेदी करतेवेळी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट (मोफा) हा कायदा लागू होतो. त्यातील तरतुदींमध्ये बिल्डर आणि ग्राहक यांच्यामधील करार कसा असावा याची माहिती दिलेली आहे. त्यानुसार करारपत्र असावे. सदनिका खरेदी करताना त्याची रक्कम चटई क्षेत्रफळाच्या (कार्पेट एरियावर) आधारावर ठरविण्यात यावी, अशी तरतूद सुधारित कायद्यात आहे. त्यानुसारच सदनिकेचे मूल्य निश्चित केले असल्याची खात्री करून घेण्यात यावी. खरेदीदार या तरतुदींकडे दुर्लक्ष करतात. त्याचा फायदा बिल्डर लॉबी घेत ...