ऑनलाईन शिक्षण आणि आपण

ऑनलाईन शिक्षण आणि आपण

डॉ. किरण मोहिते

२०२० साली महाराष्ट्रात (corona virus) करोना विषाणूचा उद्रेक झाला. त्या वर्षापासून महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. करोना आणि (Lockdown) टाळेबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. करोनानंतरच्या काळात शाळा कशा असतील? याची चर्चा विविध व्यासपीठावर घडली. त्यात प्रामुख्यान (Online Education) ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. अशा ऑनलाइन मंचाची खरोखर गरज आहे का? अशा व्यवस्थेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? कोविड-१९ (Covid-19) ने सर्वच क्षेत्रापुढे काही मूलभूत प्रश्न उभे केले त्यास शैक्षणिक क्षेत्र ही अपवाद नाही.

करोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्र सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवणे हा हेतू होता या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षणाची मानसिकता आणि ऑनलाइन शिक्षण घेण्याची क्षमता हा एवढा मोठा बदल आपल्याकडच्या पालक, विद्यार्थी कडे आहे का? या उहापोहवर भर देण्यात आला. मुलांचे लक्ष एकाच गोष्टीकडे गुंतवणे हे महाकठीण गोष्ट. शाळेत मित्र, शिक्षक, शाळेचे वातावरण या कारणामुळे तरी मुले काही प्रमाणात का होईना अभ्यासाकडे लक्ष देत होते. मात्र या सर्व वातावरणाचा अभाव असल्याने घरून शिक्षण (लर्न फॉर्म होम) या संकल्पनेची काय होईल? यशस्वी ठरेल का? अशी शंका उपस्थित राहणे स्वभाविकच होते.

लहान मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून जेवढे तुम्ही रोखाल तेवढे ते आणखी हट्टाने तीच कृती करतात. ‘मोबाईल घेऊ नको’ असं कितीही बजावून सांगितलं तरी ते या ना त्या कारणाने मोबाईल डोळ्यासमोर धरतातच. स्मार्टफोन यांच्यापासून लहान मुलांना फार काळ दूर ठेवणे शक्य होत नाही. टाळेबंदीमुळे घरात अडकून पडलेल्या लहानांना स्क्रीन टाईम पासून कसे भरकटवायचे? घरात लहान मुलांची होणारी चिडचिड, बदललेली मानसिकता हा मोठा प्रश्न समोर पालकासमोर उभा होता. करोना संकटाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय (घरच्या घरी शाळा) नव्हता. घरातील शाळांचे अनेक फायदे असले तरी वास्तवात किती परिणामकारक ठरतील हेअद्यापही स्पष्ट झाले नव्हते उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुलांना गणिता सारखा विषय सोपा करून सांगताना वेगवेगळी उदाहरणे द्यावी लागतात.

इतिहासाचे धडे समजून सांगताना ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मुलांना इतिहास समजावून सांगण्यासाठी पालक आग्रही असतात. ज्ञान आणि कौशल्य बरोबर ऑनलाइन साहित्य असते परंतु, असे असले तरी घरातील शाळा हा उपक्रम यशस्वी ठरला आहे का? हे विचारात घेतले पाहिजे. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रातील यशाचे नुकसान झाल्याचे काही अभ्यासातून पुढे आले आहे. अनेक पालकांना या पद्धतीसाठी आवश्यक असे ऑनलाइन साहित्य मिळवणे ही शक्य नसते आणि त्यांचा अंतिम परिणाम विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर झाला.

त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या गरीब असलेल्या कुटुंबातील मुले मागे पडली. अनेक पालकांसाठी पर्यायाने पाल्यासाठीही महागडी उपकरणे दृष्प्राप्त आहेत त्यामुळे ऑनलाईन अभ्यासाचा शर्यतीतून अशा प्रकारचे विद्यार्थी आपोआपच बाद झाले आहेत. अल्प उत्पन्न, उच्च उत्पन्न कुटुंबातील मुलांमधील शिक्षणाची दरी अधिक रुंदावली आहे. कौटुंबिक परिस्थिती घरातील शाळासाठी

वातावरण ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक (Computer) व इंटरनेट (Internet) जोडणी परवडत नाही तसेच या कुटुंबातील मुलांना धड गृहपाठ मोकळी जागा घरात उपलब्ध नसते. कित्येकांना चार भिंतीचे घर हे नशिबात नसते.

भारतातील २४ टक्के कुटुंबाकडे स्मार्टफोन्स

५ ते १८ वयोगटातील मुलांचा अनुभव जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण घेण्यात आले. ४० प्रश्नांची प्रश्नावली व्हाट्सअप ईमेलद्वारे पाठविण्यात आली. १३ राज्यातील १५५ विद्यार्थीनी या प्रश्नाची उत्तर दिले आहेत. ऑनलाइन शिक्षण मुठभर सुदैवी मुलांनाच मिळत आहे. कारण, भारतातील केवळ २४ टक्के कुटुंबाकडे स्मार्टफोन्स आहेत. ५ ते १८ या वयोगटातील मुले असलेल्या केवळ ११.५ टक्के घरांमध्ये कॉम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन आहे. मात्र, या सर्वांचे आयुष्य घरापुरते संकुचित झाले आहे.

५४.३ टक्के मुले स्मार्टफोनच्या माध्यमातून वर्गात हजेरी लावत आहे. तर ४०टक्के लॅपटॉप व डेस्कटॉप वापरत आहे. टॅब आयपॅड व स्मार्टफोन या साधनांचा वापर उपलब्धतेनुसार आलटून-पालटून करणाऱ्याचे प्रमाण ६ टक्के आहे. ११ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. वारंवार डेटा पॅक रिचार्ज करण्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा त्यांच्या कुटुंबावर पडत आहे.

मुले समोर असतील त्यांच्या चेहऱ्यावरून शिकविण्याचा अंदाज येतो .त्यांना समजते आहे की नाही? कंटाळा आला आहे का? थांबायचे का? पुन्हा सांगायचे?कधी उदाहरणे देऊन सांगायचे का? कधी वेगळ्या शब्दात सांगायचे का? या सार्‍याचा अंदाज घेता येतो. कॅमेर्‍यासमोर शिकवायचे झाले तर वर्गाशी जो संवाद साधायला हवा तो होत नव्हता. थोडक्यात हा एक कंटाळवाणा प्रयोग होत होता. मोबाईल रेकॉर्डिंग मुळे मुले पुन्हा ऐकू शकत होते. परंतु, हे व्हिडिओ खूप लांबलचक असेल, तर विद्यार्थ्यांचा तो विषय कंटाळवाणी ठरवू शकतो. काही मुलांना ऑनलाइन तंत्रज्ञानाची भीती वाटत आहे. बहुतांश मुले भविष्याबाबत फार उदासीन आहेत. ऑनलाइन शिक्षण देताना विद्यार्थी उपस्थित आहे का? लक्ष देतो का? याची खात्री कसे करता येईल म्हणजे झूम सारख्या प्लॅटफॉर्मवर एखादा माणूस लॉगिन झाला की कळते, विद्यार्थी उपस्थित आहे. परंतु, एक असं निश्चित करणार तो पूर्णवेळ बसला आहे की एकीकडे लेक्चर चालू करून तो इतर कामे करू शकेल किंवा बाहेर फिरून येऊ शकेल.

विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे यावर एकच उपाय दिसतो मात्र त्यातही कॉपी करणे, उत्तरे विचारून लिहिणे होऊ शकते. यासाठी शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. काळाबरोबर रहावे लागेल. पुस्तकी शिक्षण खरोखरच कालबाह्य होत आहे, आता आपल्याला हवी ती माहिती फक्त एका क्लिकवर मिळत असेल, तर हीं पद्धत फार काळ चालेल असे वाटत नाही.

तात्पर्य काय तर कोविड- १९ (Covid-19) नंतर जग बदलणार आहे आणि आपण या बदलासाठी तयार होऊ, या कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, “अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला! अनेक मुलांना करोना संकट ओसरल्यानंतर मजुरीच्या कामांना जुंपले जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटू शकते त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑनलाईन शिक्षण आणि आपण
डॉ. किरण मोहिते