Tag: Dr Kiran Mohite

नियोजनबद्ध, सहकारीवृर्त्ती मुर्तीची अनोखी भेट
विशेष लेख

नियोजनबद्ध, सहकारीवृर्त्ती मुर्तीची अनोखी भेट

प्रा. डॉ. किरण मोहिते २००० - ०१ साली स्वामी सदानंद भारती शिक्षण शास्त्र महाविद्यालय श्रीरामपूर येथे BEd ला ऍडमिशन घेतलंल. या महाविद्यालयाच्या वर्गमित्रांनी ६ नोव्हेंबर २०२२ राजी गेट टुगेदर घेण्याच ठरवलं. त्या दिवशी रविवार होता. तब्बल वीस वर्षांनंतर BEd कॉलेजची मित्र भेटणार, गुरुवर्य भेटणार, या उत्सुकतेपोटी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली. नियोजन केले. आठ दिवस अगोदर सरांना फोन केला. “ सर! तुम्हीं आमच्या घरी यायचं! आपण येथूनच दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीने श्रीरामपूरला जाऊ " सर म्हणाले. “ घरी चर्चा करतों अन् सांगतो.” सर आपल्या घरी येणार या आशेने घरी सर्व काही नियोजन केलं. दुसऱ्या दिवशी परत सरांना फोन केला. सरांनी लगेच होकार दिला. मला म्हणाले “ मोहिते मी तुझ्या घरी मुक्कामी येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण श्रीरामपूरला जाऊ ”. ते “मोहिते” या आडनावाने मला हाक ...
पहाटपावलं
विशेष लेख

पहाटपावलं

Follow Us डॉ. किरण मोहिते प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा असा विचार सुरु होतो. काय मनात सुरू असलेले विचार म्हणजे "थर्टी फर्स्ट " काहींचे संकल्प काळया दगडावरील रेघेप्रमाणे असतात. काहीजण संकल्प कृतीतही आणतात. काही जणांचे संकल्प एक दोन दिवसांसाठीच असतात नंतर विरून जातात.काहीजण वर्षानुवर्ष पाळतात. दरवर्षी असंख्य विचार मनात येतात पण त्यातले प्रत्यक्षात काहीच उतरत नाहीत. आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. सामाजिक बांधिलकी, सिव्हिक सेन्स पाळायचे आहेत. समाजात चुकीच्या ज्या गोष्टी होत आहे त्याच्या विरोधात एकवटाचे आहे. वजन कमी करायचे आहे. नवीन वर्षात फिरायला जाण्याचे ठरविणे, सकाळी लवकर उठणे. व्यायाम सुरु करायचा आहे. वृक्षारोपण करायचे आहे. सकारात्मक विचार करणे, असे अनेक संकल्प नववर्षाच्या ...
गावाकडची… किनार
विशेष लेख

गावाकडची… किनार

डॉ. किरण मोहिते. रात्रीचे १० वाजले, गावाला पोहोचायला. बाजूला डोगर, कॅनॉल वाहत होता. कॅनॉलच्या बाजूला छोट्टस सपार होत. मी मोठ्या दिमाखात चार चाकी गाडी समोर लावली. आत प्रवेश केला. लक्ख उजेडाचा प्रकाश. मी विचारलं लाईट कशी घेतली. उत्तर आलं आकडा टाकून. त्या बल्ब भोवती किर्र करणारी रातकिड फिरत होती. दोन विट्टांवर शेगडी. चारी बाजूंनी ताडपदरी लावलेली. वरून पत्रा, दरवाजाची छोटी किनार उघडीच. एका कोपऱ्यात चार पायी लावलेली. त्यावर मुलगा अन् आजोबा आडवी पडलेली होती. त्या बाजूला हंडा, कलशी, पाण्यानी भरलेलं मडक, कोन्याला छोटस कुत्र्याचे पिल्लू निपचित पडलं होतं. देव्हारा समोरच मांडला होता. त्यामध्ये तुळजाभवानी देवीचा फोटो. समोरच अथरून टाकल होत. मनात विचार आला, शहरांमधील मिजास, थाट वेगळाच. बेडरूम, किचन वट्टा, बाथरूम, अशा सुविधा असून देखील समाधान नाही. सपरात बेडकाचा देखील सहवास...
ऑनलाईन शिक्षण आणि आपण
विशेष लेख, शैक्षणिक

ऑनलाईन शिक्षण आणि आपण

 डॉ. किरण मोहिते २०२० साली महाराष्ट्रात (corona virus) करोना विषाणूचा उद्रेक झाला. त्या वर्षापासून महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. करोना आणि (Lockdown) टाळेबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. करोनानंतरच्या काळात शाळा कशा असतील? याची चर्चा विविध व्यासपीठावर घडली. त्यात प्रामुख्यान (Online Education) ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. अशा ऑनलाइन मंचाची खरोखर गरज आहे का? अशा व्यवस्थेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? कोविड-१९ (Covid-19) ने सर्वच क्षेत्रापुढे काही मूलभूत प्रश्न उभे केले त्यास शैक्षणिक क्षेत्र ही अपवाद नाही. करोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्र सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवणे हा हेतू होता या पार्श्वभूमीवर ऑन...
संगती करावी सदा सज्जनाची! सावली नसावी कधी दुर्जनाची!
सिटिझन जर्नालिस्ट

संगती करावी सदा सज्जनाची! सावली नसावी कधी दुर्जनाची!

डॉ. किरण मोहिते नातवंड म्हणजे दुधाची साय. पोटाच्या गोळ्या पेक्षाही नातवावर प्रेम, आपुलकी, माया असणारे. त्या माया पोटे ताड ताड बोलणारे देखील असे माझे आजोबा गावावरून पुण्यात यायचे. सातारा वरून पुण्यात येताना थेट रेल्वेने प्रवास करून चक्क देहु रोड पर्यंत लोकलने एकटे प्रवास करायचे. मंदिरात जाण येणं चालू असेयाचं. किर्तन, भजन, तोंड पाठ, पेटी घेयाचे अन भजन गात बसेयचे. वय साधारण पणे ८६ वर्ष. या वयात तरुणांना देखील लाजवेल असं चालणं, बोलण, स्मरणशक्ती, एका डोळ्याने अंधुकसं दिसायचं एवढंच. मी म्हटलो दादा एखाद भजन म्हणा मी डायरीत लिहून ठेवतो. त्यांनी स्वयं लिखित तयार केललं कडव... संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची ( 1 ) कुण्या दुर्बलता नको जोर दाउ&nb...
आदिवासी समाज, परंपरा व वाटचाल
विशेष लेख

आदिवासी समाज, परंपरा व वाटचाल

प्रा. डॉ. किरण मोहिते सिंधू संस्कृतीच्या उत्खनातील आदिवासींचा उल्लेख आर्याच्या भारतातील आगनापूर्वी या देशात प्रगत संस्कृती असलेल्या लोकांचे अस्तित्व होते या लोकांना द्राविडीयन लोक म्हणतात. हे लोक म्हणजे नागपूजक होते. भारतात सिंधूच्या सुपीक खोऱ्यात हडप्पा आणि मोंहजोदडो हे दोन शहर अस्तित्वात होते. हडप्पा व मोंहजोदडो येथील उत्खनन प्राचीन संस्कृतीस 'हरप्पा संस्कृती' किंवा 'नागर संस्कृती' असे म्हणतात. ही आदिवासीची मूळ संस्कृती आहे. म्हणून हिला मूळ निवासीयांची संस्कृती असे म्हणतात. प्राचीन इतिहासकारांनी तिला सिंधू संस्कृती असे नाव दिले. हे द्राविडीयन लोक आजच्या भटक्या, शुद्र दलित आदिवासींचे पूर्वज आहेत. म्हणूनच सिंधू संस्कृतीला मूळ निवासी यांची संस्कृती किंवा द्रविडीयन संस्कृती म्हटले जाते. सिंधू संस्कृतीत धाडसी, शूर आर्याचे भारतात आगमन झाले. आर्यानी लोकांच्या संपत्ती काबीज केल्...