डॉ. किरण मोहिते
प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा असा विचार सुरु होतो. काय मनात सुरू असलेले विचार म्हणजे “थर्टी फर्स्ट ”
काहींचे संकल्प काळया दगडावरील रेघेप्रमाणे असतात. काहीजण संकल्प कृतीतही आणतात. काही जणांचे संकल्प एक दोन दिवसांसाठीच असतात नंतर विरून जातात.काहीजण वर्षानुवर्ष पाळतात. दरवर्षी असंख्य विचार मनात येतात पण त्यातले प्रत्यक्षात काहीच उतरत नाहीत.
आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. सामाजिक बांधिलकी, सिव्हिक सेन्स पाळायचे आहेत. समाजात चुकीच्या ज्या गोष्टी होत आहे त्याच्या विरोधात एकवटाचे आहे. वजन कमी करायचे आहे. नवीन वर्षात फिरायला जाण्याचे ठरविणे, सकाळी लवकर उठणे. व्यायाम सुरु करायचा आहे. वृक्षारोपण करायचे आहे. सकारात्मक विचार करणे, असे अनेक संकल्प नववर्षाच्या प्रारंभी अनेकांनी केलेली असतात. असे संकल्प काही दिवसांपूर्तीच असतात.
एक पु.लं.चा वाचण्यात आलेला किस्सा….. एकदा काय झालं. एक जण पु.लं.ची मुलाखत घ्यायला आला. त्यांन पहिलाच प्रश्न विचारला- तुमचा रोजचा दिनक्रम कसा असतो? मग पु.लं नी त्यांचा दिनक्रम सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले. त्याचं काय आहे. सकाळी मी जरा उशिराच उठतो. चहा बिहा, पेपर बिपर. नाश्ता विष्टा झाल्यावर फिरायला बाहेर पडतो. रस्त्याने कुणीकुणी भेटतात. मग याची टिंगल कर ,त्याची टवाळी कर, या कट्ट्यावरून त्या कट्ट्यावर गप्पा मारताना अकरा-साडेअकरा कसे होतात कळत नाही. घरी आल्यावर आंघोळ करतो. तोपर्यंत जेवायची वेळ होते. मग दुपारची वामकुक्षी. पाच वाजता उठतो. तोपर्यंत कोणी ना कोणी भेटायला येतात. त्यांच्याशी अघळपघळ गप्पा होतात तोपर्यंत रात्रीचे जेवायची वेळ होते. मग जेवणबेवण झाल्यावर दूरदर्शनवर एखादं नाटक किंवा जुना चित्रपट असेल तर बघतो. साडे अकरा बारा होतात झोपायला. मग झोपतो. त्या मुलाखतकाराने विचारलं, “मग लिहिता केव्हा”? पुलं म्हणाले,”दुसऱ्या दिवशी”….
२०२१ मध्ये बरेच काही शिकायला मिळाले. आयुष्याचं महत्व काय असतं? हे उमजून आलं. आज मनस्थिती नसतानासुद्धा आज आपण पुन्हा एकदा नव्या दमाने, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत. जे घडले, ते विसरून पुन्हा नव्याने आपलं आयुष्य जगण्यासाठी तयार आहोत. २०२०,२०२१ अंगावर शहारे आणणारे वर्ष संपत आले आहे. नवीन वर्ष आपल्याला मागील वर्षापासून शिकवलेल्या धडयांचा वापर करुन ही आणखी चांगली करण्यासाठी पुन्हा संधी देणार आहे.
तुमच्यातील काहीजण नवीन वर्ष ‘न्यू यू ‘ तयार करण्याचे संधी म्हणून पाहतील. जुने वर्ष आपल्यासाठी कसे संपले याची पर्वा न करता नवीन आपल्यासाठी परिष्कृत आपल्याला तयार करण्याची योग्य संधी सादर करते. आपण सुरुवातीपासून प्रारंभ करीत नाही परंतु त्याऐवजी आपण जुन्या वर्षाच्या अनुभवांमधून घेतलेले धडे घेण्यासाठी परत येत आहोत.
आपल्या जीवनातील येणाऱ्या प्रत्येक मार्गावर कोणतीही अडचण आली नसती तर आपणआपल्या कर्तृत्वाचा मुहूर्त रूढ करू शकलो नसतो. आपल्या जीवनात आपण चित्रकार आहोत.
ब्रश- प्रत्येक अनुभव, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक स्मृतीच्या प्रत्येक नवीन स्ट्रोकसह उत्कृष्ट नमुना उतरवीत आहोत. आपण ब्रशच्या एका स्ट्रोकसह उत्कृष्ट नमुना तयार करू शकत नाही. आपले जीवन उत्कृष्ट कृती तयार करण्यासाठी फोकस, समर्पण, शिस्त, चिकाटी आवश्यक आहे.
आलेले वर्ष कधी गेले कळलच नाही. असे आपण दरवर्षी म्हणतो. काळाची गती सुरूच असते. कुणाचा तरी भूतकाळ कोणत्या तरी पुढच्या पिढीचा वर्तमानकाळ असतो. आपली नाममुद्रा काहीजण विलक्षण कर्तुत्वाने उमटून गेलेली कितीतरी माणसं असतात. त्यातली काही नाव इतिहासात अमर होतात तर काही नामशेष होतात.आजची बालमनं उद्या तरुण होतात. आजची तारुण्य मन वयस्कर होतात आणि वृद्धांना आठवणीचा भुतकाळ स्मरत राहतो.
वर्ष संपताना आठवलं अरे,
जगायचं राहूनच गेलं….
जेजे काय होतं
आपण ठरवलेलं…..
कितीदा तरी घोकलो
लिहून हि पाहिलं
सोयीस्कर विसरावं
हे मात्र कधी नसतं ठरलेलं
कसे राहूनच जाते
आपण ठरवलेलं…….
बरंच बरंच राहून जात
या धकाधकीच्या जिंदागणीत
गुंतागुंत सुखदुःखाच्या खेळात
असे बरंचसं राहून गेलं
आपण ठरवलेलं…….
लोकासाठी करता करता
घरासाठी मरायचं
घराची गाडी ठीक करायचं
माझं राहूनचं गेलं
अरे राहूनच गेलं
जे जे काय होतं
आपण ठरवलेलं……
आईची’सोन्या रे’ अशी ती हाक
आणि माझी काळजी करताना दाटलेला
हुंदक्याचा पीळवटणारा आवाज
डोळ्यात आलेलं पाणी,
पुसायच राहून गेलं
मला माझेआयुष्य
तुमच्यासवे जगायचं राहून गेलं
माझ्याच माणसानी
आज निरोप घेताना
वर्ष संपताना आठवलं
अरे राहुनचं गेलं……