- नवीन वर्षानिमित्त प्रभागातील नागरिकांना शुभेच्छा संदेश ; शहरात भाजपा वाहतूक आघाडीकडून विधायक उपक्रम
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी तब्बल १० हजार दिनदर्शिकांचे वाटप करण्याचे काम सुरू केले आहे. नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा संदेशही दिला. प्रभागातील नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नववर्ष आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपक मोढवे-पाटील यांनी जनसंपर्क वाढवला आहे. त्यांनी १० हजार दिनदर्शिका वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मोढवे-पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रभागातील नागरिक, छोटे व्यावसायिक, नोकरदार यांच्या भेटीगाठी घेऊन शुभेच्छा संदेशही दिला जात आहे.
शहरातील वाहतूक सक्षमीकरणासाठी वेळोवेळी पुढाकर घेत असतानाच दीपक मोढवे-पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न केला आहे. प्रभागातील पायाभूत सोयी-सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांशी थेट संपर्क करुन प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.