निगडीतील अभिमान स्कुलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

निगडीतील अभिमान स्कुलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

पिंपरी : निगडी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये गणित दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी लयबध्द पाढे म्हटले. इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी भूमितीय आकाराचे थ्रीडी मॉडेल्स बनवून त्यांची माहिती दिली.

इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सोप्या पद्धतीने गणिताची उदाहरणे लवकरात लवकर कसे सोडवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आजच्या कार्यक्रमास वालचंद संचेती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी मार्गदर्शन केले.