पिंपरी : निगडी प्राधिकरणमधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. यासाठी इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी वेशभूषा धारण करून शेतकऱ्यांचे घोषवाक्य सादर केले. इयत्ता तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांनी शेती अवजारांचा उपयोग विद्यार्थ्यांना सांगितला. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुबक पद्धतीने बैलगाडी व ट्रॅक्टर कागद व पुठ्ठ्याचा वापर करून बनवले होते.
प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे उपक्रम प्रदर्शनांमध्ये सादर करण्यात आले होते. ट्रॅक्टर, बैलगाडी यांचे प्रदर्शनांमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले.