पिंपरी : निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजचा मुखवटा, इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थीकॅरल सॉन्ग तसेच इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी जिंगल बेल आकर्षक पद्धतीने बनवले होते. मुलांमध्ये यावेळी खूप मोठा उत्साह व आनंद दिसून आला. शाळेमध्ये खूप सुंदर क्रीब बनवण्यात आले होते.
यामध्ये प्रभू येशू जन्माचा देखावा दाखवण्यात आला. नाताळ गीता बरोबरच सांताक्लॉज मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांमध्ये रमून गेला होता. यावेळी शाळा जिंगल बेल या गाण्याने दुमदुमून गेली. कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची रूपरेषा व मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी केले.