काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाला सन २०२१ चा जागृत सत्कर्म पुरस्कार प्रदान

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाला सन २०२१ चा जागृत सत्कर्म पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघ अनेक विविध प्रकारचे उपक्रम घेऊन सभासदांना वृध्दापकाळत आनंद देणारे आदर्श उत्कृष्ट सामाजिक कार्य करत असतो. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्यानिमित्ताने कांचन मुव्हीज प्रविण घराडे परिवारातर्फे ‘एक दिवस सुखाचा’ या कार्यक्रमात शहरातील मोठ्या प्रसिद्ध या संघाला सन २०२१ चा जागृत सत्कर्म या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यानिमित्ताने संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, उपाध्यक्ष सुखदेव खेडकर यांना शाल पुष्प गुच्छ, पुरस्कार प्रशस्तिपत्र देवुन चित्रपट निर्मिते बाळासाहेब बांगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापौर माई ढोरे, नगरसेविका उषामाई काळे, चित्रपट श्रेत्रातील कलाकार, प्रशासकीय अधिकारी, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी संघाच्या कार्याचा गौरव केला.

त्यावेळी मधुकर नाना काळे, संघाचे सहसचिव योग गुरू सुरेश विटकर, खजिनदार प्रकाश गाढवे, सह खजिनदार गंगाधर घाडगे, संचालक प्रभाकर गुरव, मधुकर पंदेरे, माजी अध्यक्ष दशरथ वीर, महिला उपाध्यक्ष शुभांगी देसाई, संचालिका संगीता कोकणे, रेश्मा नायकवडी, गोदावरी रामगडे, यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतुल वाघ यांनी केले.