रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी : रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७३ प्रजासत्ताक दिन उत्साहात सोशल डिस्टंसिन्ग पाळून साजरा करण्यात आला. कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक व समता सैनिक मेजर सुरेश भालेराव, लायन्स क्लब प्रेसिडेंट अंजुम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते दिपक तरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके, सामाजिक कार्यकर्ते राजेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे, इंदु सूर्यवंशी (लायन्स क्लब सेक्रेटरी), विजया ताकवाले (लायन्स क्लब मेंबर), शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

“देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय ७३ प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.” असे संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, यांनी उद्गार काढले.

शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले. विद्यार्थ्यानी देशभक्ती गीत, संस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किंजल चव्हाण आणि भारताची राज्यघटना संविधान वाचन सुंनदा साळवी यांनी केले. रेणू राठी यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. अशा या विविध कार्यक्रमाने सजलेल्या प्रजासताक दिनाचे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सांगता करण्यात आली.