विकसित समाजात अजूनही उपेक्षितांचे वेगळे जग शहरात आहे – प्रा. दिपक जाधव

विकसित समाजात अजूनही उपेक्षितांचे वेगळे जग शहरात आहे - प्रा. दिपक जाधव

चिंचवड : समाजाची एक विकसित स्थिती आसपास आपण पहात असतो, मात्र अजूनही उपेक्षितांचे वेगळे जग शहरात आहे. अशी व्यथा प्रा. दिपक जाधव यांनी व्यक्त केले. बिजलीनगर येथील नचिकेत बालग्राममध्ये देव-दर्शन कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. दिपक जाधव यांनी आपला ३५ वा वाढदिवस गरीब आणि उपेक्षित मुलांना खाऊ वाटप करून साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते.

त्या प्रसंगी प्रा. वैशाली जाधव, संस्थेचे संचालक डॉ. भालचंद्र ब्रम्हेच्या, सिद्धार्थ ब्रम्हेच्या, नयना मावळे, शयनाज शेख, दिलीप पेटकर, यल्लमा कोलगवी आदी उपस्थित होते.

विकसित समाजात अजूनही उपेक्षितांचे वेगळे जग शहरात आहे - प्रा. दिपक जाधव

प्रा. दिपक जाधव म्हणाले की, “मी आणि माझी पत्नी दरवर्षी आमच्या घरातील वाढदिवस गोरगरीब वस्तीतील लोकांना काही जीवनावश्यक वस्तु, भोजन, अल्पोपाहार देऊन साजरा करत असतो. उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये वाढदिवस साजरा करून मी इथे फक्त कर्तव्य करत आहे.”

त्या ठिकाणी प्रा. वैशाली गायकवाड यांनी मुलांसमोर गाणे सादर केले. राहुल ब्रम्हेच्या स्मृती संस्थेमार्फत नचिकेत बालग्रामाचे संचालक डॉ. भालचंद्र ब्रम्हेच्या यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की, देशात अनाथ मुलांची संख्या फार मोठी आहे. गरिबी आणि आई वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलांचे संगोपन केले नाही, तर ही मुले चुकीच्या मार्गाकडे वळतात. शिक्षण, श्रम आणि सांस्कृतिक संस्कार या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन गेली २१ वर्षे आम्ही करत आहोत. इथे आठवीपर्यंत शिक्षण दिले जाते. दानशूर लोक आम्हाला अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तूंची मदत करतात. तसेच रोख रकमेतून दान मिळते.