बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
चिंचवड, ता. ८ : महात्मा फुले नगर येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतीक हॉल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा मनिषा गटकळ यांनी केले होते.
या शिबिरामध्ये बीपी, सुगर, मधुमेह आदी तपासणी व प्राथमिक औषध उपचार करण्यात आले. महात्मा फुले नगर, पूर्णा नगर, कृष्णा नगर या परिसरातील आबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात शिबिरांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आणि औषधोपचार घेतले. या शिबिरास डॉ. शुभम उंबरहांडे, डॉ. सायली जाधव, सुनीता पवार, प्रतीमा खांडेकर यांनी आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी पिंपरी चिंचवडमधील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट, नगरसेविका व माजी शहराध्यक्षा वैशाली काळभोर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे, युवा नेते कुशाग्र कदम, माधव पाटील, प्रशांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र छाबडा, युवक उपशहराध्यक्ष योगेश मोरे व कल्पेश हर्णे, शहर सरचिटणीस संदीप चव्हाण, युवा नेते अनिल भोसले, मारुती जाधव, प्रसाद डमढेरे, ओम शांती ज्येष्ठ नागरिक संघाचे यशवंत कन्हेरे, ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वास सोहनी, शहर सरचिटणीस काशीनाथ जगताप, युवा नेते विकास गोरे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम, युवा नेते स्वप्निल शेंडगे व जयंत गटकळ, बचत गट अध्यक्षा शिला भोंडवे, उपाध्यक्षा सविता धुमाळ, उपशहराध्यक्षा आशा मराठे व पूनम वाघ, भोसरी विधानसभा सरचिटणीस लता पिपळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मनिषा गटकळ यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत असताना पाहण्यास मिळाले.