महिलांनी न्यू होम मिनिस्टरमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत लुटला कार्यक्रमाचा आनंद

महिलांनी न्यू होम मिनिस्टरमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत लुटला कार्यक्रमाचा आनंद

पिंपरी : सोमनाथ दादा तापकीर युवा मंचच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ३२ मधील महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण स्वराज रक्षक मालिकेतील राणू आक्काची भुमिका साकारलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे तसेच वन फोर थ्री या नवीन चित्रपटाची टीम उपस्थित होती.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ३२ मधील हजारो महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रत्येक सहभागी महिलेस एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. तसेच विजेत्या महिलांना अनुक्रमे दुचाकी, टीव्ही, कुलर, फ्रीज, सोन्याची नथ, बिजवे पैठणी अशा अनेक प्रकारच्या वस्तू भेटवस्तू देण्यात आल्या.

महिलांनी न्यू होम मिनिस्टरमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत लुटला कार्यक्रमाचा आनंद

यामध्ये विजेता म्हणून शिल्पा देशमुख, दीपा मोटे, हिराबाई पाटील, करुणा उशिरे व मंगल लोणकर यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी माजी नगरसेविका ज्योती भारती, नगरसेवक विनोद नढे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पांचाळ, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, देविदास आप्पा नखाते, सुखदेव खेडकर, दत्तात्रय पवार, राजू पवार, प्रवीण खरात, शरद मस्के, संजय पगारे, रवी नांगरे, ज्योतिबा कामगार मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी खैरे, प्रकाश अंकुश, दिग्विजय नढे, मच्छिंद्र नढे, जगदीश नढे, निलेश बेंद्रे, बालाजी पांचाळ तसेच युवा मंचचे व ओम साई ग्रुपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश परळीकर यांनी केले तर सोमनाथ तापकीर यांनी आभार मानले.