वाल्हेकरवाडीतील जेतवन बुद्ध विहारात धनगर समाज कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहात

वाल्हेकरवाडीतील जेतवन बुद्ध विहारात धनगर समाज कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहात

चिंचवड : जेजुरी येथे २१ नोव्हेंबरला होत असलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय धनगर जागृती परिषदेच्या तयारीचा एक भाग म्हणून मौर्य क्रांती संघाच्या वतीने वाल्हेकरवाडीतील जेतवन बुद्ध विहार येथे नुकतेच कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मौर्य क्रांती संघ हे एक सामाजिक संघटन असून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात कार्यरत आहे. संयोजन बहुजन समाज पक्षाचे शहर कोषाध्यक्ष राहूल मदने, विनोद बरकडे, बिभीशन घोडके व सुधाकर सरेकर यांनी केले.

मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी बलभीम माथेले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर ट्रस्टचे अध्यक्ष संजय नाईकवाडे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे शहराध्यक्ष महावीर काळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत धनगर, शिवाजी आवारे, विठ्ठल सरेकर, दादासाहेब कोपनर, रावसाहेब वायकुळे, तानाजी कोपनर, बिरमल मारकड, गणेश गोफणे, सोमनाथ खरात, प्रवीण मदने, दीपक वायकुळे, जयवंत वायकुळे, सौरव बनगर, बापू वायकुळे, अशोक मारकड, बापूसाहेब बंडगर, पोपट खारतोडे यांच्यासह सकल धनगर समाज उपस्थित होता.

धनगर जमातीचा गौरवशाली इतिहास, वर्तमानस्थिती,‌ सामाजिक नेतृत्वाच्या विकासाची प्रक्रिया, समाजमनात समाजऋण फेडण्याची भावना निर्माण करून, तिचा विकास करण्याच्या दृष्टीने व आजच्या काळात धनगर जमातीच्या हक्क अधिकाराबाबत “लक्ष्यभेदी जागृती” घडवून आणण्याच्या दृष्टीने २१ नोव्हेंबर २०२१ रोजी जेजुरी येथे जागृती परिषद होत आहे. त्यानिमित्त या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

जेजुरी येथे तिसऱ्या राज्यस्तरीय धनगर जागृती परिषदेच्या तयारीचा एक भाग म्हणून हे शिबिर आयोजित केले. त्यामध्ये धनगर जमातीतील अधिकारी वर्ग, डाॅक्टर्स, इंजिनीअर्स, विधीज्ञ, प्राध्यापक, शिक्षक, नाॅन टिचींग स्टाफ उद्योजक, कामगार, शेतकरी, युवक, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. त्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच जेजुरीत होणाऱ्या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत. वाल्हेकरवाडीतील जेतवन बुद्ध विहारात धनगर समाज कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहात

राहुल मदने, पिंपरी चिंचवड शहर कोषाध्यक्ष, बहुजन समाज पक्ष