
लोकमराठी : महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी १४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता हे प्रसारण होईल.
बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती केंद्र सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली आहे. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शोषित, वंचित वर्गासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षावर आधारित हा चित्रपट विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाला आहे. विविध भाषांमधून हा चित्रपट देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यत पोहोचला आहे. येत्या मंगळवारी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन मराठी भाषेतून डबिंग केलेल्या चित्रपटाचे प्रसारण होणार आहे.
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती
- आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे