
लोकमराठी न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही सध्या गंभीर परिस्थिती आहे. या आजाराचा धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचून घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करा. असे आवाहन डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारलेले अभिनेते सागर देशमुख यांनी जनतेला केले आहे.
दरवर्षी १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं एकत्र जमत असतात. मात्र, सद्या परिस्थितीत समस्त भारतीयांनी, त्यांच्या अनुयायांनी आपल्या घरातच राहून त्यांच्या प्रती आपली श्रद्धा व प्रेम अर्पण करावे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांच्या हितासाठी जे निर्देश दिले आहेत. त्यांचे पालन करीत घरातच राहण्याचे आवाहन सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेतील प्रमुख भूमिकातील अभिनेते देशमुख यांनी केले आहे.
एका व्हिडिओद्वारे अभिनेते देशमुख यांनी आपले मांडले असून त्यात त्यांनी सांगितले, की या जयंती दिनी आपण सर्वांनी डॉ . आंबेडकर यांनी लिहिलेली व जगासाठी मार्गदर्शक ठरलेल्या पुस्तकांचे वाचन करावे. सध्याच्या परिस्थितीत ही पुस्तके आपणाला ऑनलाईन उपलब्ध आहेत. तसेच जेव्हा आता लॉकडाऊन संपेल तेव्हा अनेक ग्रंथालयांमध्ये ही पुस्तके उपलब्ध आहेत. तेथून आपण ती घेऊन नक्कीच त्यांचे वाचन करावे आणि त्यांनी ज्या बाबी सांगितल्या आहेत, त्या आपण अंगिकारावी असे आवाहन सागर यांनी केले आहे.
- महिन्यापूर्वी लग्न झालेल्या जावयाचा सासरवाडीत खून
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती