डॉ. किरण मोहिते.
रात्रीचे १० वाजले, गावाला पोहोचायला. बाजूला डोगर, कॅनॉल वाहत होता. कॅनॉलच्या बाजूला छोट्टस सपार होत. मी मोठ्या दिमाखात चार चाकी गाडी समोर लावली. आत प्रवेश केला. लक्ख उजेडाचा प्रकाश. मी विचारलं लाईट कशी घेतली. उत्तर आलं आकडा टाकून. त्या बल्ब भोवती किर्र करणारी रातकिड फिरत होती. दोन विट्टांवर शेगडी. चारी बाजूंनी ताडपदरी लावलेली. वरून पत्रा, दरवाजाची छोटी किनार उघडीच. एका कोपऱ्यात चार पायी लावलेली. त्यावर मुलगा अन् आजोबा आडवी पडलेली होती. त्या बाजूला हंडा, कलशी, पाण्यानी भरलेलं मडक, कोन्याला छोटस कुत्र्याचे पिल्लू निपचित पडलं होतं. देव्हारा समोरच मांडला होता. त्यामध्ये तुळजाभवानी देवीचा फोटो. समोरच अथरून टाकल होत. मनात विचार आला, शहरांमधील मिजास, थाट वेगळाच. बेडरूम, किचन वट्टा, बाथरूम, अशा सुविधा असून देखील समाधान नाही.
सपरात बेडकाचा देखील सहवास होता. मांजराचे पिल्लू देखिल होत. शेपटी लांबलचक, गुबगबित, भरमसाठ केस, म्याव म्याव करून ओरडत होती. भांड्याचा गराडा पडला होता. सपराच्या बाजूला शेत. कोपऱ्यात काळोख्यात किर्र करणारी विहीर होती. शेतामध्ये मोर म्याव म्याव करून ओरडत होते. कालवड पाळलेल. चार ते पाच लिटर दूध मिळत होत. त्यावरच त्यांची रोजरोटी चाललेली. साधा पिण्याचा हंडा आणायचं म्हटलं कॅनॉलमध्ये उतराव लागत. म्हणजे जीव धोक्यात घालून पाणी आणावं लागायचं. घरात तिघेजणच. आम्ही घरात आल्यावर तांब्याभर घटाघटा पाणी घेतलं. पाणी शहरापेक्षा गोड लागत होत. माऊली आजारी होती. तरीदेखील घरातील पूर्ण काम करायची. स्वयंपाक करून खायला घालायची. नवरा मात्र, पिऊन पडायचा. शेतात काम करण, रोजची मजुरी दोनशे रूपये मिळायची. त्यावरच गुजरणा. लहापणापासूनच कष्ट शेवटला गेलं. आता काय होत नाही. गुडघे दुखीचा त्रास, डोक भिनभायला होत. आत्ता काहिच काम करू वाटत नाही. उत्साह निघून गेला आहे. अस गप्प पडावं अस वाटत. हतायला आलेलं पोरग, अन् सूनबाई, नातवांड सगळी मुंबईला निघून गेलीली. तेथे वॉचमनची नोकरी पत्करलेली असून १२ हजार पगार मिळतो. त्याठिकाणी भाड्याने रूम घेतलीय. गावाला जम बसाना म्हणून सगळी निघुन गेलेली.
आत्ता म्हातारंपणीचा काटीचा आधार कोणाचंच नव्हता. एवढं हाल असल तरी आम्ही येणार म्हणून गावरान कोंबडा करून ठेवला होता. चुलीवर शिजवलेला, मनमुराद खाल्ला. शहरात माञ काही पाव्हन यायचं म्हटलं तर स्वयंपाक करायला जीवावर येतं. हिडीसपेडीस चालु होत. नाकी मुरडली जातात. ना तिथंल पाणी चवदार. ना स्वयंपाक.
तिन्ही मुलीची लग्न झालेली. एकुलता एक मुलगा तो देखिल मुबईला. घरी कोणीच नाही. माञ मधल्या लेकीचा मुलगा तिच्या जवळ होता. आठवीला असेल, शिक्षणं माञ ऑनलाईन, घरचं सर्व काही तोच बघायचा. दूध डेअरीला घालन, पाणी भरण, गुर चऱ्यायेला नेहन, शेता तलं बघन, धारा काढन, आर्धा एकर शेती, गुरासाठी मका केलेली. विहिरीतून पाणी, जेमतेम उत्पन, सकाळच्या प्रहरी दोघी बहिणीच्या गप्पा रंगल्या. चार वाजले असतील. सकाळची उठायची सवय. शहरात मात्र आठ नऊ वाजे पर्यंत झोपायचं. सकाळी लवकर उट्टायच आणि वजन कमी करण्यासाठी चालपिट करायची.
गावातील माणसांना ना पैशाची आशा. ना खायेची आशा. फक्त भेटायला आल की त्यांना आपुलकी वाटते. गावापासुन दोन किलोमीटर अंतरावर केजळे मळ्यात 10 ते 15 वस्तीच. बहुतांशची मुले मुंबईलाच कामासाठी गेलेली. जुनी माणसं शेती करण्यासाठी गावात थांबलेली. त्यांना शहरात थांबू वाटत नाही. एकदाच गेट बंद केला. दरवाजा बंद केला तर घरात कोंड्ल्या सारखं वाटतं. घर खायला उटतं. गावात मात्र मोकळी हवा. खळखळत पाणी. रुचकर, काळीभोर शेती, खालेल अन्न देखिल पचन होत. शहरात खायेच अन् बसायेच. गावात एकत्र कुटुब. चुलीवर भाकऱ्या थापयेच्या, कडई भरून कोरड्यास करायच. एकत्रित जेवायला बसायेच. कादा भाकरी, अन् कोर ड्यास पिटल असेल तर बात न्यारीच. इथे 5 स्टार हॉटेलपेक्षा फिक्क पडेल.
1975 ला पतीराज नोकरीला मुंबईला होते. खानावळ 50 रू. कपड्याची मेल होती.13 ते 14वर्ष काम वरळीला केलं. पगार 600 रू. राहायला भायखळेत. गाळ्यावर, सायकलीवर जात असताना ट्रक नी धडक दिली. अन् पाय मोडला. त्यावेळी 10, 12 हजार खर्च आलेला. रिटायरचा पैसा पाय नीट करण्यात गेला. 1982 ला मेल बंद पडलेली. त्यामुळें गावाकडे प्रस्थान. 1990 ला गावाकडे 2 ते 3 एकर जमीन घेतली असती तर आज अशी परिस्थिती उद्भभवली नसती.
घरात पोरांनी दुचाकी घेतलेली. आजुन देखील कर्ज फिटलले नाहीं. १७०० रूपये हप्ता, तो भरताना देखील जीव नकोसा होतो. ग्रामपंचायतमधे सरपंच जवळ घरकुल साठी दोन वर्ष झालं अर्ज केलेला. परंतू अजून काही तपास नाही. हेच घरकुल श्रीमंतच असतं तर लगेच तजवीज झाली असती. आता रडतकुडत जगायचं का? हसत खेळत जगायेच. आज देखील रडत कुडत न बसता आलेल्या परिस्थिला सामोरं जात आहे. आपल सगळ असुन देखील लगेच कुढत बसतो. हि मानस आजचा दिवस ढकलायचा पुढचा विचार करायचा नाही. बिन्धास्त जगायच. एवढच करतात.