उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिवंगत नेते दत्ता साने यांच्या निवासस्थानी अचानक भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिवंगत नेते दत्ता साने यांच्या निवासस्थानी अचानक भेट

पिंपरी चिंचवड (बाळासाहेब मुळे) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. ४) राष्ट्रवादीचे दिवंगत नेते दत्ता काका साने यांच्या यश निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

अजित पवार यांनी दत्ता साने यांच्या मातोश्री (आज्जी) तसेच परिवारातील सर्व सदस्यांची आस्थेने विचारपूस केली. अजित पवार नेहमीच साने कुटुंबाची विचारपूस करत असतात. प्रत्यक्ष घरी आल्या नंतर अजित पवार यांनी दत्ताकाकांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील सर्व नेते, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत दत्ता साने हे पिंपरीचिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोठे नेते, व महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांचे खूप मोठे समाजकार्य होते. कोरोना काळामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांना, परप्रांतीयांना जेवणाची सोय केली होती. तसेच धान्य वाटपही केले होते. परंतु दुर्दैवाने त्यांनाच कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.