वाकड रोडला सार्वजनिक शौचालयाची दिपक चखाले यांची मागणी

वाकड रोडला सार्वजनिक शौचालयाची दिपक चखाले यांची मागणी

वाकड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असून लोकसंख्येच्या प्रमाणात वाकड रोड ते वाकड चौक हा परिसर अत्यंत वर्दळीचा भाग आहे. मात्र, या तिन किलोमीटर अंतर असलेल्या भागात सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्वरीत वाकड रोडला सुलभ शौचालय तयार करण्यात यावे, अशी मागणी वाकड येथील युवा कार्यकर्ते दिपक चखाले यांनी केली आहे.

याबाबत चखाले यांनी वाकडचे स्थनिक नगरसेवक मयुर कलाटे व राहुल कलाटे यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले आहे. यावेळी बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते.

वाकड रोडवर आयटी पार्कची गर्दी, उच्चभ्रू सोसायट्या, परराज्यातील कामगार मोठया प्रमाणात आहे. तसेच वाकड रोड टी पाॅईंट व पान शाॅप यावरती खुप गर्दी असते. या भागातून ये-जा करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. परंतु वाकड रोड या ठिकाणी शौचालय नसल्या कारणाने मुख्य रस्ताच्या कडेला मिळेल त्या ठिकाणी पुरूष वर्ग लघुशंका करताना दिसतात. तरी भविष्याची गरज समजून त्वरीत सार्वजनिक शौचालय होणे गरजेचे आहे. असे चखाले यांनी सांगितले.