उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवारातर्फे पोलिसांना 50,000 आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

ताज्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो कराफेसबुक |ट्वीटर |युट्यूब |


पिंपरी : कोरोना जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी व आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवार आणि टायगर ग्रुप पिंपरी चिंचवड यांच्या वतीने संपुर्ण पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच पुण्यातील काही पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीमध्ये आयुष्य मंत्रालयांनी सुचवलेल्या आर्सेनिक होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

सध्या सर्वात जास्त पोलीस हे कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत, त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी हे वाटप करण्यात आले. यावेळी राहुल शिंदे, रेखा साळी, मंगेश पाटील, किरण तरंगे, आणि मित्र परिवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.