लक्ष्मीबाई नारायण जगधने यांचे निधन

लक्ष्मीबाई नारायण जगधने यांचे निधन

अहमदनगर : मुळेवाडी (ता. कर्जत) येथील रहिवासी लक्ष्मीबाई नारायण जगधने (वय ९०) यांचे रविवारी (ता. २४) रात्री नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली व नातुंडे-परतुंडे असा प्रपंच असून मुळेवाडी ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी नारायण जगधने, लाला नारायण जगधने, हिरामण नारायण जगधने, मंदा सत्यवान गायकवाड आणि मिलन राजू कांबळे यांच्या त्या मातोश्री, तर पत्रकार रविंद्र संभाजी जगधने यांच्या त्या आजी होत. लक्ष्मीबाई यांचा स्वभाव मनमिळाऊ व दायाळू होता.