Tag: pcmc pimpri chinchwad pune

पिंपरी चिंचवडमधील लाॅकडाऊनच्या अफवेवर विश्वास ठेवू नये – आयुक्त
पिंपरी चिंचवड, वायरल

पिंपरी चिंचवडमधील लाॅकडाऊनच्या अफवेवर विश्वास ठेवू नये – आयुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तथापि सोशल मिडीयामध्ये प्रसारीत होत असलेल्या याबाबतच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याने यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. ...
सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला हा निर्णय
पिंपरी चिंचवड

सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला हा निर्णय

पिंपरी : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या भेटीसाठी अनेक राजकीय व्यक्ती, पदाधिकारी, नागरिक गर्दी करत आहेत. पोलीस आयुक्तालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्तांच्या सदिच्छा भेटीसाठी येऊ नये, असे फर्मान त्यांनी जनसंपर्क अधिकारीद्वारे देण्यात आलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना भेटण्याचा अनेक जण आपापल्या परीने आटापिटा करत आहेत. फोटोसाठी मास्क न घालता, सोशल डिस्टसिंगचेही तीनतेरा वाजवताना दिसत आहेत. त्यामुळे हे सर्व पाहता शिस्तप्रिय कृष्ण प्रकाश यांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे लक्ष्यात येताच नागरिक आणि इतर राजकीय व्यक्तींनी सदिच...
पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव | बंदोबस्त न केल्यास संभाजी ब्रिगेड महापालिकेत सोडणार मोकाट कुत्री
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव | बंदोबस्त न केल्यास संभाजी ब्रिगेड महापालिकेत सोडणार मोकाट कुत्री

पिंपरी : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने आठ दिवसात या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिका भवनात त्यांना आणून सोडण्यात येतील. असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक दिवसांपासून शहरात विविध भागातील गर्दीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आणि अश्यातच रस्त्यारस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. काही ठिकाणी तर लहान मुलं, महिलांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पुढे अचानक ही कुत्री येऊन अपघात होत...
उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवारातर्फे पोलिसांना 50,000 आर्सेनिक गोळ्यांचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवारातर्फे पोलिसांना 50,000 आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

पिंपरी : कोरोना जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी व आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवार आणि टायगर ग्रुप पिंपरी चिंचवड यांच्या वतीने संपुर्ण पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच पुण्यातील काही पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीमध्ये आयुष्य मंत्रालयांनी सुचवलेल्या आर्सेनिक होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सध्या सर्वात जास्त पोलीस हे कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत, त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी हे वाटप करण्यात आले. यावेळी राहुल शिंदे, रेखा साळी, मंगेश पाटील, किरण तरंगे, आणि मित्र परिवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ...
शहर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी “कोविड- १९ योध्दा” म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे “पोलीस मित्र” पुढे सरसावले
पिंपरी चिंचवड

शहर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी “कोविड- १९ योध्दा” म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे “पोलीस मित्र” पुढे सरसावले

पिंपरी चिंचवड : सध्या महाराष्ट्रात कोरोना बधितांचा आकडा वाढतच चालला आहे. कोविड १९ या विषाणूची तीव्रता पुणे विभाग आणि मुंबई विभागात वाढलेली आहे. बधितांचा वाढत्या आलेखामुळे प्रशासनास मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच ' फ्रंट वॅlरीयर्स ' म्हणून कार्यरत असणाऱ्या राज्यातील ५०० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलिसांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. अश्या परस्थितीत शासनाच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी आता मनुष्यबळ पूर्ततेसाठी पोलीस मित्रांची तसेच एस पी ओंची मदत घेतलेली आहे. कोविड १९ योध्दा म्हणून ते शहर पोलिसांना सहकार्य करणार आहेत. ३० जून २०२० च्या मुदतीपर्यंत ते पिंपरी आयुक्तालय अख्यारीत शहर पोलिस विभागास वरिष्ठ अधिकारी यांचे सूचनेनुसार सहकार्य करणार आहेत. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील या...
Coronavirus : पुणे, पिंपरीत पाच रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात ११६ नवे रुग्ण
पुणे

Coronavirus : पुणे, पिंपरीत पाच रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात ११६ नवे रुग्ण

पुणे : पुणे शुक्रवारी दिवसभरात पुणे शहरात चार, तर पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे, पिंपरी आणि परिसरातील मृतांची संख्या ७१ झाली आहे. दिवसभरात पुणे शहरात १०४ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२ असे ११६ नवे रुग्ण आढळले असून परिसरातील एकूण रुग्णसंख्या ११०१ वर पोहोचली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी रात्री याबाबत माहिती दिली आहे. ससून रुग्णालयात उपचार घेणारे ४० आणि ६३ वर्षीय, तर इतर खासगी रुग्णालयात उपचार घेणारे ४० आणि ५२ वर्षीय रुग्ण शुक्रवारी दगावले. या सर्व रुग्णांना श्वासोच्छ्वासाचे तसेच हृदयरोगाशी संबंधित गुंतागुंतीचे आजार होते. पिंपरी-चिंचवडमध्ये ६५ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुणे शहरातून शुक्रवारी १६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४६ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधून एकूण २१ रुग्ण बरे होऊन घरी ...
Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच दिवसात तब्बल १२ करोनाबाधित आढळल्याने सध्या शहरात भीतीचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमधील करोनाबाधितांचा संख्या ७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. करोनामुळे आज ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, आज सापडलेल्या १२ करोना बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने आणखीच फास घट्ट आवळला असून एकाच दिवसात तब्बल १२ जण करोना पॉजीटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यात महिला, लहान मुले आणि पुरुष आहेत अशी माहिती महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ७९ वर पोहचली असून चिंता वाढली आहे. करो...
Coronavirus : खरेदीत मलई खाण्यासाठी अधिकाऱ्याला दमबाजी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Coronavirus : खरेदीत मलई खाण्यासाठी अधिकाऱ्याला दमबाजी

पिंपरी : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चालविलेल्या प्रत्येक खरेदीत आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना वाढीव दराने काम देण्यासाठी काही माजी पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांचा दबाव आणण्याचा निर्ल्लज प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरु आहे. जादा दराने ठराविक ठेकेदारांकडून खरेदी करण्यास एका अधिकाऱ्याने विरोध केला असता मंगळवारी काही माजी पदाधिकाऱ्यांनी मनपा आवारातच त्याला दमबाजी केली. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाराचा धसका घेतल्याने त्या अधिकाऱ्याला व्हील चेअरच्या सहाय्याने थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कोरोनाचा वाढता संर्संग रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाऊन असून मनपाचे केवळ १० % कर्मचारी कामावर आहेत. तसेच महानगरपालिकेची मार्च व एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्या असून स्थायी समितीच्या बैठकासुद्धा रद्द करण्यात आल्या आ...
कामगारांची उपासमार टाळण्यासाठी सोनिया भोजन थाळी सुरू करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

कामगारांची उपासमार टाळण्यासाठी सोनिया भोजन थाळी सुरू करण्याची मागणी

पिंपरी (लोकमराठी) : महाराष्ट्रात 23 मार्चपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील गरजु कष्टकरी कामगारांना त्यांच्या कुटुंबासहीत उपासमारीची वेळ आली आहे. तरी त्यांच्यासाठी किमान जेवणाची सोय व्हावी म्हणून ज्या पद्धतीने शिवभोजन व शरदभोजन थाळी सुरू करण्यात आली, त्याप्रमाणेच सोनिया भोजन थाळी सुरू करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड असंघटित कामगार काँग्रेसचे सुंदर कांबळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबत कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनिया भोजन थाळी सुरू केल्यास त्याचा फायदा आता कोरोनाच्या काळात कामगारांना होईल. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार वर्ग हा सर्वात जास्त काँग्रेसप्रेमी असून इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसने नेहमी कष्टकरी कामगार वर्गाचा विचार केला आहे. त...
Lockdown : पिंपरीत जूनपर्यंत कर सूट
पिंपरी चिंचवड

Lockdown : पिंपरीत जूनपर्यंत कर सूट

आयुक्तांचा ३०० गृहसंस्थांशी वेबसंवाद, प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी : पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयोजित वेबसंवादात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे आदींनी संवाद साधला आणि तब्बल तीनशे नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन केले. महापालिकेने कर भरण्यासाठी जूनपर्यंत सूट दिली असून या काळात कोणताही दंड आकारला जाणार नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात हर्डीकर म्हणाले की, शहरातील गृहनिर्माण सोसायटय़ांपुढे पालिकेच्या करांबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. तूर्त पालिकेने जूनपर्यंत कर भरण्याची सूट दिली आहे. मात्र, मालमत्ता करात सवलत देण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आर्थिक स्थितीचे विश्लेषण करून या विषयी योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वास...