सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला हा निर्णय

सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतला हा निर्णय

पिंपरी : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या भेटीसाठी अनेक राजकीय व्यक्ती, पदाधिकारी, नागरिक गर्दी करत आहेत. पोलीस आयुक्तालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्तांच्या सदिच्छा भेटीसाठी येऊ नये, असे फर्मान त्यांनी जनसंपर्क अधिकारीद्वारे देण्यात आलं आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना भेटण्याचा अनेक जण आपापल्या परीने आटापिटा करत आहेत. फोटोसाठी मास्क न घालता, सोशल डिस्टसिंगचेही तीनतेरा वाजवताना दिसत आहेत. त्यामुळे हे सर्व पाहता शिस्तप्रिय कृष्ण प्रकाश यांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे लक्ष्यात येताच नागरिक आणि इतर राजकीय व्यक्तींनी सदिच्छा भेट न घेण्याचे फर्मान सोडले आहेत. असे पत्रकच जनसंप्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या पत्रकामध्ये सोशल डिस्टसिंग पाळले जात नसल्याचे म्हटले असून अत्यंत महत्वाचे काम असल्यास रविवार आणि सरकारी सुट्टी वगळता सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भेटावे असे म्हटले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी आर.आर पाटील यांनी माहिती दिली आहे.