फिटनेस क्लबमधील प्रत्येक स्त्री राणी लक्ष्मीबाईच्या रुपात सामाजिक जळवळीचा भाग होईल – कुंदा भिसे

फिटनेस क्लबमधील प्रत्येक स्त्री राणी लक्ष्मीबाईच्या रुपात सामाजिक जळवळीचा भाग होईल – कुंदा भिसे
  • जागतिक महिला दिनानिमित्त कुंदा संजय भिसे यांचा सन्मान
  • युनिव्हर्सल फाईट अ‍ॅण्ड फिटनेस क्लबतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी, ता. ८ : अधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात महिला यशाची शिखरे चढत आहे. कौटुंबिक जबाबदा-या पार पाडत असताना तिला असंख्य संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून धाडसाने मार्ग काढत ती स्वतःच्या पायावर उभी राहात आहे. हे करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी तिला सक्षम करण्याचे काम फिटनेस क्लब करीत आहे. फिटनेस क्लबमध्ये स्वसंरक्षणाचे धडे गिरवल्यानंतर प्रत्येक स्त्री झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या रुपात बाहेर पडेल, अशा शब्दांत उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा कुंदा भिसे यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या.

जागतिक महिला दानानिमित्त पिंपळे सौदागर येथील युनिव्हर्सल फाईट आणि फिटनेस क्लबच्या वतीने उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजप महिला मोर्चाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांना निमंत्रित करण्यात आले. समाजासाठी झपाटून योगदान देण्याची त्यांची वृत्ती व महिला केंद्रीत विकासाला चालणा देण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अनिता काटे, गौरी कुटे व क्लबमधील प्रशिक्षीत महिला यावेळी उपस्थित होत्या.

कुंदा भिसे म्हणाल्या की, पिंपळे सौदागरमध्ये नोकरी, व्यवसाय करणा-या महिलांची संख्या मोठी आहे. ऑनलाईन व डीजिटल माध्यमातून चालणा-या व्यवसायात सुध्दा महिलांनी स्वतःला सिध्द करून दाखविले आहे. आपल्या भागातील शेकडो महिला हिंजवडी आयटी पार्क, विविध बॅंका, प्रशासकीय कार्यालये, हॉटेल्स, ज्वेलर्स, शाळा, कॉलेजेस, रुग्णालये आदी ठिकाणी काम करत आहेत. छोट्या-मोठ्या व्यवसायात देखील महिलांचा टक्का अधिक आहे. महिला अधिक स्ववलंबी व्हावी, तिचे अर्थार्जन सुरळीत व्हावे, यासाठी उन्नतिच्या माध्यमातून आम्ही पिंपळे सौदागरमधील प्रत्येक महिलेशी बांधिलकी जपत आलो आहे. हे करत असताना महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणे देखील तितकेच गरजेचे आहे. ते काम फिटनेस क्लब जाणिवपूर्वक करत असल्याचा मला अभिमान आहे. इथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारी प्रत्येक स्त्री राणी लक्ष्मीबाई, सावित्रीमाई, जिजाऊ, अहिल्यादेवी बनून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देईल. त्यांचे कार्य समाजासाठी आदर्श ठरेल, याच मी महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते.व लवकरच महिलांसाठी असे प्रशिक्षण उन्नति सोशल फाउंडेशनकडून देऊ.