वंचित बहुजन आघाडीच्या बंदमुळे रूग्ण व नातेवाईकांची उपासमार

वंचित बहुजन आघाडीच्या बंदमुळे रूग्ण व नातेवाईकांची उपासमार

पिंपरी, (लोकमराठी) : नागरिकत्व सुधारणा कायदा व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंजित बहुजन आघाडीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत वंचितच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय व डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयासमोरील खाद्य पदार्थ्यांच्या टपऱ्या व हॉटेल जबरदस्तीने बंद करण्यास सांगितल्या. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले रूग्ण व नातेवाईकांची उपासमार झाली.

या दोन्ही रूग्णालयात राज्याच्या विविध भागातून रूग्ण उपचारासाठी येतात. रूग्णालयाच्या समोरच माफक दरात जेवणाची व नाष्ट्याची सोय असलेल्या अनेक टपऱ्या व हॉटेल आहेत. मात्र, शुक्रवारी वंचितच्या कार्यकर्त्यांनी या टपऱ्या व हॉटेल बंद करण्यास सांगितले. त्यामुळे व्यावसायिकांनी तातडीने दुकाने बंद केले. त्यामुळे अनेक रूग्ण व नातेवाईकांची उपासमार झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या बंदमुळे रूग्ण व नातेवाईकांची उपासमार

याबाबत वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले, अत्यावश्यक सेवा देणारे कोणतेही दुकाने बंद केली जाणार नाहीत. असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. तसेच लोक उत्स्फूर्तपणे बंदात सहभागी होत आहेत.