अन्नपदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे निर्देश

अन्नपदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे निर्देश

मुंबई, (लोकमराठी) : राज्यात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी विभागाने कठोर पावले उचलावी. औषध निरीक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिल्या.


विधानभवनात राज्यमंत्री श्री.पाटील यांनी विभागाचा आढावा घेतला. यावेळी विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील नागरिकांना भेसळमुक्त दर्जेदार अन्नघटक व पदार्थ मिळाले पाहिजेत. जेणेकरुन, नागरिकांच्या आरोग्याला कुठलीही बाधा पोहोचणार नाही. अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही राज्यमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यात रस्त्यांवर तसेच छोट्या दुकानातून अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या सुमारे 7 लाख विक्रेत्यांची नोंदणी झाली असून टप्प्याटप्प्याने त्यांना अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे श्रीमती दराडे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी राज्यमंत्र्यांनी विभागाचा आढावा घेताना सामान्य नागरिकांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले.