महात्मा फुले महाविद्यालयाच्या शुभम धायगुडेचे सुवर्ण यश

महात्मा फुले महाविद्यालयाच्या शुभम धायगुडेचे सुवर्ण यश

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचा शुभम धायगुडे याने ओडिसा येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेमध्ये 1500 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात सुवर्णपदक संपादन केले.

तर 400 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. शुभम हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एकमेव सुवर्णपदक जिंकून देणारा जलतरण पट्टू ठरला. या खेळाडूस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड व क्रीडा विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे व सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले.