विवाहबाह्य संबंध व पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोसरीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल

विवाहबाह्य संबंध व पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोसरीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल

पिंपरी : भोसरीतील एका उच्चशिक्षित डॉक्टराने स्वतःच्या विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीला वारंवार मारहाण, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात थेट भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अमोल फुलसुंदर (वय ४१, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, भोसरीतील एका रुग्णालयात हा डॉक्टर रुग्णसेवा करत असताना त्याने अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध ठेवले. मात्र,. काही दिवसांनी ही बाब त्याच्या पत्नीला कळल्यानंतर पत्नीने या डॉक्टरला जाब विचारला असता, डॉक्टरने पत्नीला दारू पिऊन मारहाण केली. तसेच तीच्यावर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार करून वारंवार शोषण केले.

तसेच पत्नीचा ठाणे येथील फ्लॅट विकून पैसे खर्चून टाकले. डॉक्टरच्या या गैरकृत्यबाबत त्याच्या नातेवाईकांना व पत्नीच्या नातेवाईकांना सांगितले असता, नातेवाईकांनी या डॉक्टरला समजावले. मात्र, डॉक्टरकडून पत्नीला दारू पिऊन मारहाण व अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार सुरूच होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने शेवटी भोसरी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर कौटुंबिक हिंसाचार, मारहाण व भारतीय दंड विधान, कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमरदीप पुजारी करीत आहेत.