हल्लेखोर गुटखामाफियांना अटक व कठोर कारवाईची गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी

  • पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा जालन्यात दाखल
  • एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने पेालीस अधिक्षकांचा सत्कार

हल्लेखोर गुटखामाफियांना अटक व कठोर कारवाईची गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी

लोकमराठी न्यूज : हल्लेखोर गुटखामाफियांना तातडीने अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी महाराष्ट्राचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन करण्यात आली असल्याचे अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले.

पत्रकार विकास बागडी यांच्यावर २९ नोव्हेंबर रोजी गुटखा माफियांनी भ्याड हल्ला केला. पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा जालन्यात दाखल केला. त्यामुळे पत्रकारांच्या वतीने पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील विविध भागात निर्भिड पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. या संदर्भात सरकारने कठोर भुमिका घेत पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा पारीत करुन पत्रकारांना संरक्षण दिले आहे. राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या संदर्भात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पहिला गुन्हा जालना येथे दाखल झाला आहे. विकास बागडी या पत्रकारावर गुटख्याची बातमी केल्यामुळे रात्रीच्या वेळी, हल्लेखोरांनी हल्ला करुन त्यांना जखमी केले होते.

त्यामुळे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र या पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पत्रकारांची मागणी विचारात घेत पोलीस अधिक्षक यांनी कायद्यानुसार कारवाई करुन पत्रकारांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्रच्या वतीने पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अर्पण गोयल, कैलास फुलारी, रविकांत दानम, दिलीप पोहनेरकर, नारायण माने, राजेश भालेराव, शेख मुसा, लियाकतअली खान, विष्णू कदम, अच्युत मोरे, अमित कुलकर्णी, रवि जैस्वाल, विजय साळी, सय्यद नदीम, रमेश गंगोदक, शाहनवाज कुरेशी, दिनेश नंद, सय्यद करीम, अश्पाक पटेल, गोकुळ स्वामी यांची उपस्थिती होती.

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्रच्या जालना जिल्हा शाखेचे त्याबाबत राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार,राज्य अध्यक्ष शीतल करदेकर, जालना पोलिस अधीक्षक एस. चैतन्य व जालना युनिट अभिनंदन केले आहे .

मात्र गुन्हेगारांना तत्काळ अटक करून कठोर शासन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे अशी आग्रहाची भूमिका एनयुजे महाराष्ट्रने घेतली आहे.