कर्जमाफीवरून रोहित पवारांनी घेतला फडणवीसांचा समाचार

कर्जमाफीवरून रोहित पवारांनी घेतला फडणवीसांचा समाचार

पुणे, (लोकमराठी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली होती. त्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत, सरकारची ही योजना फसवी आहे. सरकारने सरसकट कर्ममाफीचं आश्वासन पाळलं नाही असा आरोप त्यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपांचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

रोहित पवार म्हणाले की, विरोधक आरोप प्रत्यारोप करणारच त्यांनीही कर्जमाफी केली होती. दीड लाखाचं कर्ज माफ केले होते. पण त्यावरचे व्याज भरले तरच कर्जमाफी होणार होती. त्यामुळे ती योजना यशस्वी झाली नाही. काही शेतकऱ्यांनी दीड लाखापेक्षा अधिक असणारं कर्ज भरले पण अजूनही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यांनी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे केले.

ते पुढे म्हणाले, वेगवेगळ्या कागदपत्रावर सह्या करण्यास भाग पाडले. कर्जमाफीचा जीआर तीस वेळा बदलला. अशाप्रकारे मागचं सरकार अडकत अडकत चालले होते. आताच्या सरकारने सरकसकट दोन लाखाची कर्जमाफी केली. 95 टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.