Tag: Devendra Fadnavis

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिलं होतं, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या पत्रावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. हे पत्र मीच काढलं होतं अशी कबुली देतानाच दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यामुळेच मी रिफायनरीचा प्राथमिक अहवाल मागवला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उद्धव ठाकरे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. मी बारसूचं पत्र दिलं होतं. मी पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? उद्धव ठाकरेंचं एवढं ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडलं? आरेचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? रोज उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमद...
राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश
विशेष लेख

राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण करून महाराष्ट्रात भाजपेईंनी मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना 'जोडे मारो' (Bharat Jodo Yatra) कार्यक्रमही राबवला. या कार्यक्रमासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात आंदोलनकर्तीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) जोडे मारण्याच्या ऐवजी सावरकरांवरच जोडे मारण्यासाठी हात उगारला होता असे हास्यास्पद चित्र दिसले. बरे तर बरे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी तिला ताबडतोब अडवले म्हणून. नाहीतर बिचाऱ्या सावरकरांची काही धडगत नव्हती. त्यांनाच चपलांचा मार बसला असता. याचा अर्थ भाजपने सावरकर आणि राहुल गांधी यांना ओळखता न येणारे भाडोत्रीआंदोलनकर्ते मागवले होते की काय? दुसरे म्हणजे सावरकरांच्या (V D Savarkar) विरोधात मोठ्या प्रमाणात जाहीरपणे वक्तव्य करणे केव्हा सुरू झाले याबद्दल भाजपने जरूर चिंतन करायला हवे. 2014 पूर्वी सावरकरांविषयी अशा पद्धती...
अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील
महाराष्ट्र, मोठी बातमी

अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : गुजरात (Gujarat) निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र (Maharashtra) कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारला केला आहे. वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात (Nagpur) येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्ली...
कर्जमाफीवरून रोहित पवारांनी घेतला फडणवीसांचा समाचार
पुणे

कर्जमाफीवरून रोहित पवारांनी घेतला फडणवीसांचा समाचार

पुणे, (लोकमराठी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली होती. त्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत, सरकारची ही योजना फसवी आहे. सरकारने सरसकट कर्ममाफीचं आश्वासन पाळलं नाही असा आरोप त्यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपांचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय. रोहित पवार म्हणाले की, विरोधक आरोप प्रत्यारोप करणारच त्यांनीही कर्जमाफी केली होती. दीड लाखाचं कर्ज माफ केले होते. पण त्यावरचे व्याज भरले तरच कर्जमाफी होणार होती. त्यामुळे ती योजना यशस्वी झाली नाही. काही शेतकऱ्यांनी दीड लाखापेक्षा अधिक असणारं कर्ज भरले पण अजूनही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यांनी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे केले. ते पुढे म्हणाले, वेगवेगळ्या कागदपत्रावर सह्या करण्यास भाग पाडले. कर्जम...