काळेवाडीत भररस्त्यात कारने घेतला पेट

काळेवाडीत भररस्त्यात कारने घेतला पेट

पिंपरी चिंचवड, (लोकमराठी) : काळेवाडी येथे भर रस्त्यात कारने पेट घेतला. काळेवाडीकडून पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डी मार्टजवळ आज, रविवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीकडून पिंपरीच्या दिशेने येत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. काही नागरिकांनी पाणी टाकुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने आणखीनच वाढली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनतर आग आटोक्यात आली. दरम्यान, यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.