पिंपरी चिंचवड महानपालिकेतील स्थायी समितीचा भ्रष्टाचार रंगे हात पकडून हि किरीट सोमय्या गप्प कसे – डाॅ. कैलास कदम

पिंपरी चिंचवड महानपालिकेतील स्थायी समितीचा भ्रष्टाचार रंगे हात पकडून हि किरीट सोमय्या गप्प कसे - डाॅ. कैलास कदम

पिंपरी चिंचवड : महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाच प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडून तुरूंगात रवानगी केली. मात्र, सकाळ, दुपारी, संध्याकाळ विरोधी पक्षांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणणारे माजी खासदार किरीट सोमय्या आत्ता गप्प कसे? असा हल्लाबोल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांनी केला. मुकाई चौक, किवळे येथे झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. त्यावेळी एम. बी. कॅम्प व विकासनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे संयोजन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस शाम भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी प्रस्तावना मध्ये पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार कै.प्रा. रामकृष्ण मोरे साहेबांच्या विचारांना उजाळा दिला. सभेमध्ये देहुरोड ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तु, अल्पसंख्याक सेल मावळ तालुका अध्यक्ष गफुर शेख, फुले शाहु आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, माजी पोलीस अधिकारी अबुबकर लांडगे व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी विचार मांडले.

सभेत डाॅ. कैलास कदम यांनी मोदी सरकारने वाढविलेल्या महागाईवर सविस्तर विवेचन केले, ते आपल्या भाषणात म्हणाले की, “मोदी सरकारने डिझेल, पेट्रोल, रसोई गॅस, खाद्य तेल व इतर जीवानाश्यक वस्तूमध्ये मुळ किंमती पेक्षा भरमसाठ वाढ केल्यामुळे महागाईचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे दररोजचे अंदाजपत्रक कोलमडले असून या माध्यमातून सरकारने आत्तापर्यंत २६ लाख कोटी रूपये फक्त सर्व सामान्य माणसाच्या खिशातून काढले आहेत. पंतप्रधान मोदी हे स्वतःच्या प्रतिमा संवर्धनासाठी करोडो रूपये जाहिरातीच्या माध्यमातून खर्च करीत आहेत. काँग्रेस पक्षानीे देशपातळीवर महागाई विरोधात हाहा: कार आंदोलन सुरु केलेले आहे. यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद आहे. केंद्र सरकारची लोकप्रियता दिवसेंदिवस घसरत असून नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सपाटून मार खाल्लेला आहे.”

सभेला सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाऊ लुणावत, देहूरोड ब्लाॅक काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, माजी प्रदेशाध्यक्ष शामला ताई सोनवणे, पिंपरी चिंचवड अपंग सेलचे अध्यक्षा रुखमिनी भिंगारकर, छाया देसले, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, दिपक चौगुले, चित्रपट निर्माता व काँग्रेस अध्यक्ष सुनिल कंडेरा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक सायसर यांनी तर आभार राजू ठोकळे यांनी केले.