
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : प्रभाग क्रमांक दोन बोल्हाईचा मळा जाधववाडी चिखली येथील कॉलनी क्रमांक सात (२) मधील रस्त्याचे काम ठेकेदाराने जाणून बुजून रखडवले आहे. यामध्ये स्थानिक सत्ताधारी व ठेकेदार यांच्या संगनमताने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट नसल्याने हे घाण पाणी रस्त्याच्या वरून जात आहे. परिणामी आरोग्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, तरी ठेकेदाराने रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सुनील कुसाळकर सोबत अनंत सुपेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चेतन कदम, दिलीप इनकर, संदीप कुसळकर बापू कळसाईत यांनी दिला आहे.